मलिका ए मालिका 

भक्ती परब
शनिवार, 15 एप्रिल 2017

सध्या छोट्या पडद्यावर नागिन-2 ही मालिका प्रेक्षकप्रिय आहेच; पण ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेतही नंबर 1 आहे. अनेक मालिकांना या मालिकेनं मात दिलीय. अनेक निर्मात्यांना या मालिकेमुळे घाम फुटतो. त्यामुळे या मालिकेच्या पुढे कसे जाता येईल, याचीच खलबतं छोट्या पडद्यावर सुरू असतात; पण त्यांचा टिकाव सध्या तरी अजिबात लागत नाहीय. याचं एकमेव कारण मलिका ए मालिका मौनी रॉय. "नागिन'चा पहिला सीझन असो की सध्याचा दुसरा सीझन. मौनी रॉयशिवाय नागिन मालिकेची आपण कल्पनाच करू शकत नाही. इतक्‍या उंचीवर मौनी रॉयनं या मालिकेतील शिवान्या हे पात्र नेऊन ठेवलंय.

नागीन मालिकेतलं ते खास पार्श्‍वसंगीत जे वाजताच शिवान्याचे डोळे चमकणं आणि तिचं नागीनमध्ये रूपांतर होणं या अशा मौनीच्या हरेक अदा थक्क करून सोडतात. तिचे डोळे बोलके आहेत. तिचा चेहराही खूप बोलका आहे. त्यामुळे ती स्क्रीनवर दिसली की तिच्यावरून नजर हटत नाही. असं अनेक चाहते सांगतात.

"बालाजी'ची निर्मिती असलेली ही मालिका तिच्या पहिल्या सीझनमधील प्रोमोपासून चर्चेत होती आणि आजही आहे. ही मालिका ग्रामीण, शहरी व ऑनलाईन पाहिली जाणारी नंबर 1 ची मालिका आहे. पण, आता काहीशी अशी चर्चा आहे की नागिन-2 ही मालिका लवकरच बंद होणार आहे. एकता कपूर या मालिकेचा तिसरा सीझन घेऊन दिवाळीच्या सुमारास पुन्हा येणार आहे; परंतु या तिसऱ्या सीझनमध्ये मौनी रॉय नसणार, अशी चर्चा आहे. कारण- एकता कपूर तिसऱ्या सीझनसाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. या बातमीमुळे मौनीच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. क्‍यों की सॉंस भी कभी बहू थी या मालिकेपासून मौनी एकता कपूरसोबत आहे. "क्‍यों की'मधूनच तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली. असं असताना नागिन मालिकेच्या 3 ऱ्या सीझनमध्ये मौनीलाच घ्यावं, अशी प्रेक्षकांची अपेक्षा असणारच.

आता नव्या "नागिन-3'मध्ये सगळेच नवे असतील की मौनी रॉय सोडून इतर नवे चेहरे असतील हे एकताच जाणे... 
 
टॅग्स