नमिक परत येतोय? 

संकलन : भक्ती परब  
सोमवार, 6 मार्च 2017

नमिक परत येतोय? हो हे खरं आहे का?... छोट्या पडद्यावरचा कूल लुक्‍स आणि हॅंडसम गाय नमिक पॉल परत केव्हा येणार? याची त्याच्या फॅन्सना खूपच उत्सुकता असते. सोनी टीव्हीवरची "एक दुजे के वास्ते' ही मालिका थोडक्‍यात आटोपती घेतल्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये नाराजीचा सूर होता. पण नमिक लगेचच बिनधास्त चॅनलच्या "द ट्रिप' या मालिकेत दिसला आणि त्याच्या फॅन्सना खूप आनंद झाला; पण हा आनंदही फार काळ टिकू शकला नाही. या मालिकेनेही नुकताच निरोप घेतला. "एक दुजे के वास्ते' मालिकेत श्रीमंत वकील श्रवण मल्होत्राच्या भूमिकेत नमिकला पाहताना कित्येक मुली वेड्या व्हायच्या.

नमिक परत येतोय? हो हे खरं आहे का?... छोट्या पडद्यावरचा कूल लुक्‍स आणि हॅंडसम गाय नमिक पॉल परत केव्हा येणार? याची त्याच्या फॅन्सना खूपच उत्सुकता असते. सोनी टीव्हीवरची "एक दुजे के वास्ते' ही मालिका थोडक्‍यात आटोपती घेतल्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये नाराजीचा सूर होता. पण नमिक लगेचच बिनधास्त चॅनलच्या "द ट्रिप' या मालिकेत दिसला आणि त्याच्या फॅन्सना खूप आनंद झाला; पण हा आनंदही फार काळ टिकू शकला नाही. या मालिकेनेही नुकताच निरोप घेतला. "एक दुजे के वास्ते' मालिकेत श्रीमंत वकील श्रवण मल्होत्राच्या भूमिकेत नमिकला पाहताना कित्येक मुली वेड्या व्हायच्या. त्याचं ते बोलणं, रुबाबात चालणं, त्याच्या उंचीमुळे सुमनने त्याला कुतुबमिनार म्हणणं. या साऱ्या गोष्टी त्याचे फॅन्स एन्जॉय करायचे. त्यानंतर तो द ट्रिपमध्ये डीजे आदीच्या भूमिकेत दिसला. तेव्हाही त्याचं फॅन फॉलोईंग झपाट्याने वाढलं. नमिक अशीही रॉकिंग भूमिका करू शकतो? हा तर त्याच्या फॅन्ससाठी सुखद धक्का होता. या मालिकेत आदी एक म्युझिक ट्रॅक प्ले करतो. तो म्युझिक व्हिडीओ यू ट्युबर खूपच लोकप्रिय झाला. या मालिकेचे सगळे भाग अजूनही यू ट्युबवर पाहणारे प्रेक्षक आहेत; पण सगळ्यांना हाच प्रश्‍न पडतो. हा अभिनेता बॉलिवूडमध्ये असला पाहिजे होता. मालिकांमध्ये तर तो दिसावाच; पण त्याने खूप सिनेमांमध्ये कामंही करावीत, असं त्याच्या फॅन्सना वाटतं. अलिकडेच नमिकने एक दुजे के वास्ते मालिकेला एक वर्ष झालं, त्या आठवणी जागवत त्याच्या फॅन्सबरोबर लाईव्ह चॅटिंग केलं. तिथेही सगळे त्याला हाच प्रश्‍न विचारत होते. तू छोट्या पडद्यावर पुन्हा कधी? पण त्याने काही सांगितलं नाही. उलट तो म्हणाला की, मी सध्या खूप ठिकाणी प्रॉडक्‍शन हाऊसमध्ये जाऊन फक्त ऑडिशन देतोय; पण नक्की काहीच सांगता येत नाही. नुकतीच एक चर्चा सुरू झालीय, ती अशी की नमिक छोट्या पडद्यावर परत येतोय. स्टार प्लस आणि फायरवर्क्‍सची निर्मिती असलेल्या एका मालिकेत नमिक पॉल मुख्य भूमिकेत दिसणार, अशी उडती चर्चा आहे. खरं-खोटं अजून कळू शकलेलं नाही. कारण नमिकने अजून या वृत्ताला दुजोरा दिलेला नाहीय. ही एका अशा मुलीची गोष्ट आहे, जिला एक वाईट कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. अशी कथा यापूर्वी कधी कुणीही बघितली नसेल, असा निर्मात्यांना विश्‍वास आहे. यामध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत नमिक पॉल असणार आहे; पण नायिकेची निवड अजून झालेली नाही. ही चर्चा खरी ठरली, तर नमिक फॅन्सच्या आनंदाला उधाण येईल, हे मात्र नक्की. 

Web Title: namik paul returns