नसीरूद्दीन शहांसोबत सनी? 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

सध्याची आयटम गर्ल सनी लिओनला अभिनयाच्याही ऑफर्स येत आहेत. तसं तिने "रागिणी एम.एम. एस.2', "जीस्म 2', "एक पहेली लीला', "कुछ कुछ लोचा है', "मस्तीजादे', "वन नाईट स्टॅंड' अशा काही चित्रपटातून मुख्य भूमिकाही केल्या आहेत. आता ती नसिरूद्दीन शहा यांच्याबरोबर दुसऱ्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. तिने याआधी नसिरूद्दीन शहांबरोबर "जॅकपॉट' या चित्रपटात काम केलं होतं. नसिरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांनी "इश्‍किया'नंतर आणखी एका थ्रिलर चित्रपटात काम करण्याचं ठरवलं होतं. आता "लगान'फेम अमीन हाजी असा चित्रपट घेऊन येत आहे, ज्यामध्ये त्याने अर्शद वारसी आणि नसीरूद्दीन शहा यांना घ्यायचं निश्‍चित केलंय.

सध्याची आयटम गर्ल सनी लिओनला अभिनयाच्याही ऑफर्स येत आहेत. तसं तिने "रागिणी एम.एम. एस.2', "जीस्म 2', "एक पहेली लीला', "कुछ कुछ लोचा है', "मस्तीजादे', "वन नाईट स्टॅंड' अशा काही चित्रपटातून मुख्य भूमिकाही केल्या आहेत. आता ती नसिरूद्दीन शहा यांच्याबरोबर दुसऱ्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. तिने याआधी नसिरूद्दीन शहांबरोबर "जॅकपॉट' या चित्रपटात काम केलं होतं. नसिरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांनी "इश्‍किया'नंतर आणखी एका थ्रिलर चित्रपटात काम करण्याचं ठरवलं होतं. आता "लगान'फेम अमीन हाजी असा चित्रपट घेऊन येत आहे, ज्यामध्ये त्याने अर्शद वारसी आणि नसीरूद्दीन शहा यांना घ्यायचं निश्‍चित केलंय. पण मुख्य अभिनेत्रीसाठी तो सनीला विचारण्याच्या प्रयत्नात आहे. या चित्रपटाचे नाव "कोई जाने ना' असं असणार आहे. सनीच्या या नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असेल. 
 

टॅग्स