छंद प्रितीचा चित्रपटात दिसणार सुबोध चा नवा अंदाज!

टीम ई सकाळ
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

हृदयांतर', 'तुला कळणार नाही' अशा दरमाही एका पेक्षा एक दमदार चित्रपटांतून आपले मनोरंजन करणारे आणि सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावे आता लवकरच 'प्रेमला पिक्चर्स' निर्मित 'छंद प्रितीचा' ह्या येत्या १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटात आणखीन एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

मुंबई : 'हृदयांतर', 'तुला कळणार नाही' अशा दरमाही एका पेक्षा एक दमदार चित्रपटांतून आपले मनोरंजन करणारे आणि सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावे आता लवकरच 'प्रेमला पिक्चर्स' निर्मित 'छंद प्रितीचा' ह्या येत्या १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटात आणखीन एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. 
 
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या नृत्यशैलीवर आधारित 'छंद प्रितीचा' हा आगामी सिनेमा लवकरचं आपल्या भेटीस येणार आहे. तमाशातील तन मन आणि धन ओतून वावरणार्‍या प्रत्येक मनस्वी कलाकाराच्या जीवनाचा वेध घेणारा हा चित्रपट... आजवर आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून विशेषत: चरित्रात्मक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे सुबोध भावे या चित्रपटातून 'राजाराम' नामक एका ढोलकी वादकाच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेत आढळून येणार आहेत.
 
संगीत आणि सुबोध यांचं अतूट नातं आपण ह्या आधी देखील 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातून पाहिलं आहे. संगीताचा कोणताही प्रकार असो, सुबोधची त्यातील वाखाणण्याजोगी असलेली जाणं आता आपणांस पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. निर्माते चंद्रकांत जाधव यांच्या 'प्रेमला पिक्चर्स' निर्मित 'छंद प्रितीचा' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केले असून छायाचित्रदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचे आहे तर संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलेले आहे.