'हिटलर दिदी' फेम हर्षालीच्या भविष्याची एेशी तैशी

टीम ई सकाळ
रविवार, 17 सप्टेंबर 2017

मुंबई : भविष्य हा नेहमीच कुतूहलाचा विषय ठरला आहे, पण अनेकजण वर्तमानामध्ये आयुष्याचा आनंद घेणेच जास्त पसंत करतात. आपल्याला  रामात रावण, उचला रे उचला, पाच नार एक बेजार अशा मराठी सिनेमांतून आणि दिया और बांती हम, हिटलर दिदी अशा हिंदी सिरीयल मधून आपल्या अभिनयाची झलक दाखविणारी हर्षाली झिने ही मुलगी आता 'भविष्याची ऐशी तैशी' या चित्रपटातून दिसणार आहे. 

हा ऍस्ट्रोलॉजिकल थ्रिलर सिनेमा ६ ऑक्टोबर ला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात निशी या एका कन्फ्युज्ड मुलीची भूमिका हर्षाली साकारत आहे. गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये झळकलेल्या हर्षालीला मराठी चित्रपटांत हवा तसा ब्रेक मिळालेला नाही. हा नवा चित्रपट तिला काही यश मिळवून देतो की नाही ते पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.