'अ जंटलमॅन'च्या पोस्टरवरच 'किस'; सोशल मिडीयात व्हायरल

टीम ई सकाळ
रविवार, 9 जुलै 2017

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडीस ही जोडी अ जंटलमॅन या नव्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे शूट गेले अनेक दिवस चालू आहे. पण या दोघांमधली केमिस्ट्री किती अफलातून आहे हे सांगण्यासाठी या सिनेमाच्या टीमने या दोघांचे एक हाॅट पोस्टर लाॅंच केले आहे. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि जॅकलिन एकमेकांच्या मिठीत असून एकमेकांचे चुंबन घेताना दाखवण्यात आले आहे. या पोस्टरवरून मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडीस ही जोडी अ जंटलमॅन या नव्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे शूट गेले अनेक दिवस चालू आहे. पण या दोघांमधली केमिस्ट्री किती अफलातून आहे हे सांगण्यासाठी या सिनेमाच्या टीमने या दोघांचे एक हाॅट पोस्टर लाॅंच केले आहे. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि जॅकलिन एकमेकांच्या मिठीत असून एकमेकांचे चुंबन घेताना दाखवण्यात आले आहे. या पोस्टरवरून मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

जॅकलिन आणि सिद्धार्थ यांनी आपल्या टि्वटर अकाउंटवरून हे पोस्टर शनिवारी संध्याकाळी लाॅच केले. तर या सिनेमाचा ट्रेलर सोमवारी येणार असल्याची माहितीही दिली. हे पोस्टर इतके बोल्ड असेल तर सिनेमात काय मसाला भरला असेल अशी अटकळही सिनेप्रेमी बांधू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगच्या बेफिक्रेच्या पोस्टरवरूनही असा वाद झाला होता. पण अ जंटलमॅनच्या या पोस्टरने त्यापुढची पायरी गाठली आहे. 

याबाबत बोलताना काही वाचकांंनी सोशल साईटवरच नाराजी नोंदवली आहे. खरेतर जंटलमॅन या शब्दाचा अर्थ लक्षात घेता तो असे काही पब्लिकली करेल असे वाटत नाही. या सिनेमाचे नाव आणि याचे पोस्टर हे भिन्न असून याचा समाजमनावर अप्रत्यक्ष परिणाम होेत असतो अशी भूमिका काहींनी घेतली आहे. रविवारी सकाळपासून हे पोस्टर खूप व्हायरल होत असल्याने यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.