मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अवतरणार 'विठूमाऊली'  

new serial vithumauli esakanew serial vithumauli esakal newsl news
new serial vithumauli esakanew serial vithumauli esakal newsl news

मुंबई : अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या ‘विठ्ठला’ला  माणूसपण चुकलेलं नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठल जनसामन्यांचा आपला देव आहे. भक्तांची ही माऊली आजही एकटीच विटेवर उभी आहे,त्याची अर्धांगिनी त्याच्या बाजूला,पण त्याच्या सोबत नाही, कारण रखुमाई रुसली आहे. या मागची गोष्ट  विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी लवकरच 'विठूमाऊली' या मालिकेच्या रूपानं स्टार प्रवाहवर येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पहायला मिळणार आहे.
 
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. आजवर पंढरीची वारी आणि इतर अनेक चित्रपटातून संतांना दिसलेलं विठ्ठलाचं रूप, विठ्ठलाची महती, विठ्ठलाचं प्रेम अशा कथा दाखवण्यात आल्या. मात्र, संतांच्या आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावणाऱ्या साक्षात विठ्ठलालाही नियतीचा फेरा चुकला नाही. विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्यात नेमकं काय घडलं, प्रेमात मत्सराचं किल्मिष कुठून आलं, रखुमाई विठ्ठलावर रुसून बाजूला का उभी राहिली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मालिकेत मिळणार आहेत. मालिकेतले कलाकार आणि इतर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com