आरोपांच्या फैरीतून अखेर 'न्यूटन' सुटला

मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

काही दिवसांपूर्वी राजकुमार राव याची मुख्य भूमिका असलेला अमित मसुरकर दिग्दर्शित न्यूटन हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आदल्याच दिवशी भारतातर्फे आधिकृत एंट्री म्हणून या चित्रपटाची निवड झाली आणि या चित्रपटाच्या टीमचा आनंद गगनात मावेना. ही बातमी येते न येते तोच हा चित्रपट हा काॅपी करण्यात आला असून, इराणी फिल्म सिक्रेट बॅलेट या चित्रपटाची ती काॅपी असल्याचं बोललं गेलं. 

मुंबई : काही दिवसांपूर्वी राजकुमार राव याची मुख्य भूमिका असलेला अमित मसुरकर दिग्दर्शित न्यूटन हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आदल्याच दिवशी भारतातर्फे आधिकृत एंट्री म्हणून या चित्रपटाची निवड झाली आणि या चित्रपटाच्या टीमचा आनंद गगनात मावेना. ही बातमी येते न येते तोच हा चित्रपट हा काॅपी करण्यात आला असून, इराणी फिल्म सिक्रेट बॅलेट या चित्रपटाची ती काॅपी असल्याचं बोललं गेलं. 

अनुराग कश्यपापसून अनेकांनी ही बाब लोकांच्या नजरेत आणून दिली. अमित मसूरकरनेही त्यावर खुलासा केला. आपण चित्रपट बनवायला घेतला त्यावेळी मला सिक्रेट बॅलेटची कल्पना देण्यात आली होती. हा चित्रपट मी थोडा बहुत पाहिला. पण या चित्रपटाचा आणि आमचा काहीच संबंध नाही. माझा चित्रपट पूर्णत: वेगळा आहे, असं मत त्याने व्यक्त केलं होतं. पण अनुराग कश्यपचं काही समाधान होईना. यावर त्याने सिक्रेट बॅलेट या चित्रपटाचे निर्माते मॅक्रो म्युलर यांच्याशी संपर्क साधला. अखेर त्यांनी मात्र न्यूटनच्या पारड्यात आपलं माप टाकलं आहे. न्यूटन आणि आपला चित्रपट पूर्णत: वेगळा असून त्याचा आणि आपल्या चित्रपटाचा काही संबंध नसल्याचं यात म्हटलं आहे. अनुरागनेही त्याची माहीती ट्विटरवरून दिली. 

2018 मध्ये होणाऱ्या आॅस्करसोहळ्यासाठी या चित्रपटाची निवड झाल्यानंतर आरोपाच्या या फैरी न्यूटनवर झडू लागल्या. 

Web Title: newton movie is not a copy esakal news