भारतातर्फे न्यूटन जाणार आॅस्करला!

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई : अमित मसुरकर दिग्दर्शित न्यूटन या चित्रपटाची निवड 2018 मध्ये होणाऱ्या अत्यंत मानाच्या अशा आॅस्कर पुरस्कारासाठी झाली आहे.  भारतातर्फे हा चित्रपट आॅस्करच्या शर्यतीत असेल. बेस्ट फाॅरेन लॅंग्वेज फिल्म विभागात हा चित्रपट शर्यतीत उतरेल. फिल्म फेडरेशन आॅफ इंडियाच्या समितीने आज ही घोषणा केली. अभिनेता राजकुमार रावनेही ट्विटरवरून ही माहिती दिली. 

ही माहिती देताना फिल्म फेडरेशन आॅफ इंडियाचे महासचिव सुप्राण सेन म्हणाले, 'आॅस्करला चित्रपट पाठवला जावा म्हणून एकूण एकूण 26 प्रवेश अर्ज आले होते. पण त्यापैकी सर्वांनीच एकमताने न्यूटनची निवड केली. ' या चित्रपटात न्यूटनकुमारची भूमिका राजकुमार रावने केली आहे. 

रघुवीर यादव, पंकज त्रिपाठी, अंजली पाटील यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. याबद्दल बोलताना अमित मसुरकर म्हणाले, या निवडीची बातमी कळल्यानंतर मला खूप आनंद आणि समाधान वाटते आहे. या घोषणेमुळे हा चित्रपट लोक थिएटरमध्ये जाऊन पाहातील असे मला वाटते. 4 मार्च 2018 मध्ये होणाऱ्या 90 व्या अकॅडमी अॅवाॅर्डसाठी हा चित्रपट आता पात्र ठरला आहे.