आधी मोदींची एनओसी आणा : सेन्साॅर बोर्डाची सूचना

टीम ई सकाळ
शुक्रवार, 26 मे 2017

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बनवण्यात आलेल्या अॅन इनसिग्निफिकंट मॅन या डाॅक्युमेॆटरीला जर आमच्याकडून ग्रीन सिग्नल हवा असेल, तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी आणा अशी सूचना सेन्साॅर बोर्डाने या डाॅक्युमेंटरीच्या निर्मात्यांना केली आहे. 

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बनवण्यात आलेल्या अॅन इनसिग्निफिकंट मॅन या डाॅक्युमेॆटरीला जर आमच्याकडून ग्रीन सिग्नल हवा असेल, तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी आणा अशी सूचना सेन्साॅर बोर्डाने या डाॅक्युमेंटरीच्या निर्मात्यांना केली आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावर ही डाॅक्युमेंटरी बनवण्यात आली आहे. यात नरेंद्र मोदी, शीला दीक्षित यांचे काही फुटेज वापरण्यात आले आहे. वापरण्यात आलेले फुटेज पाहता आधी मोदी यांच्यासह दीक्षित यांचीही एनओसी धेण्याची सूचना करण्यात आली आहे. आता ही फिल्म दाखवायची असेल तर आधी सूचनांचा वापर करावा लागणार आहे.