इतक्‍यात लग्न नाही - राजकुमार राव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

गुडगाववरून आलेला एक सामान्य मुलगा आज अनेक मुलींच्या दिलों की धडकन बनला आहे. राजकुमार राव सध्या "ओमेर्ता' चित्रपटातून दहशतवाद्याची भूमिका साकारतो आहे. सध्या राजकुमार बराच बिझी आहे. त्यामुळे तो लग्न कधी करणार याबद्दल त्याला प्रश्‍न विचारला गेला.

त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा आणि त्याच्या नात्याविषयी बऱ्याच दिवसांपासून बोललं जात होतं. पण, ते दोघे त्यांच्या नात्याबद्दल अजिबात बोलत नाहीत. यावर राजकुमार म्हणाला, "आम्ही लग्नाबाबत बोलत नाही याचा अर्थ असा नाही की, आम्ही लग्न करणार नाही किंवा लग्नसंस्थेवर विश्‍वास ठेवत नाही. अजून लग्नाला वेळ आहे.

 rajkumar rao patralekha

माझ्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये पत्रलेखाने मला साथ दिली आहे. एका जोडीदाराच्या रूपात तिने मला प्रत्येकवेळी साथ दिली आहे. मला ती नेहमीच पाठिंबा देते. 

Web Title: Not getting married early said by rajkumar rao