'जोकोविचला हवे दीपिका पदुकोनसोबत डेटिंग'

टीम ई सकाळ
सोमवार, 10 जुलै 2017

नोवाक जोकोविच हे नाव टेनिस विश्वाला नवे नाही. आज तो अव्वल क्रमांकावर नसला तरी त्याचा असा फॅनक्लब आहे. भारतीय अभिनेत्री दिपिका पदुकोनही त्याची फॅन आहे, म्हणूनच गेल्या वर्षी दोघांनी लाॅस एंजलिसमधल्या हाॅटेलमध्ये भेटीगाठी घेतल्या होत्या. या बाबी अनेकजण विसरूनही गेले होते. पण याला आता उजळा मिळाला आहे तो जोकोविचच्या पत्नीच्या वक्तव्यामुळे. 

मुंबई : नोवाक जोकोविच हे नाव टेनिस विश्वाला नवे नाही. आज तो अव्वल क्रमांकावर नसला तरी त्याचा असा फॅनक्लब आहे. भारतीय अभिनेत्री दिपिका पदुकोनही त्याची फॅन आहे, म्हणूनच गेल्या वर्षी दोघांनी लाॅस एंजलिसमधल्या हाॅटेलमध्ये भेटीगाठी घेतल्या होत्या. या बाबी अनेकजण विसरूनही गेले होते. पण याला आता उजळा मिळाला आहे तो जोकोविचच्या पत्नीच्या वक्तव्यामुळे. 

नोवाकला जर दिपिकासोबत डेटिंग करता आलं तर तो जास्त आनंदी राहील असं एका कार्यक्रमात तिने बोलून दाखवलं. जेलेेना रिस्टिक असं तिचं नाव असून जोकोविच आणि तिचा विवाह 2014 मध्ये झाला होता. लाॅस एंजलिसमधील दिपिका आणि नोवाकच्या भेटीच्या बातम्या त्यावेळी बऱ्याच पसरल्या होत्या. आजही या दोघांमध्ये गुपचुप संवाद असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच नोवाकची पत्नी इतकी रिअॅक्ट झाली असावी असे कळते.