सलमानशी झालेल्या 'त्या'' वादाने आता काही फरक पडत नाही: विवेक

टीम इ सकाळ
रविवार, 25 जून 2017

ही गोष्ट आहे 2003 ची. त्यावेळी ऐश्वर्याचं लग्न व्हायचं होतं. शिवाय हम दिल दे चुके सनम केल्यानंतर ती आणि सलमान यांची झालेली मैत्री जास्त चर्चेत होती. त्याचवेळी विवेक ओबेराॅय सोबत तिने क्यू हो गया ना केला आणि तिचं आणि विवेकचं सूत जुळलं. हे कळल्यावर शांत बसेल तो सलमान कसला. त्याचा जळफळाट झाला. आणि एकेदिवशी रात्री सलमानने फोन करून विवेकला धमक्या द्यायला सुरुवात केली. एक दोन नव्हे, तर तब्बल 41 फोन त्याने त्या रात्री केले होते. 

मुंबई : ही गोष्ट आहे 2003 ची. त्यावेळी ऐश्वर्याचं लग्न व्हायचं होतं. शिवाय हम दिल दे चुके सनम केल्यानंतर ती आणि सलमान यांची झालेली मैत्री जास्त चर्चेत होती. त्याचवेळी विवेक ओबेराॅय सोबत तिने क्यू हो गया ना केला आणि तिचं आणि विवेकचं सूत जुळलं. हे कळल्यावर शांत बसेल तो सलमान कसला. त्याचा जळफळाट झाला. आणि एकेदिवशी रात्री सलमानने फोन करून विवेकला धमक्या द्यायला सुरुवात केली. एक दोन नव्हे, तर तब्बल 41 फोन त्याने त्या रात्री केले होते. 

या फोन प्रकरणानंतर विवेकने पत्रकार परिषद घेतली. आणि सलमानने कसे फोन केले याचा लेखाजोखा समोर मांडला. त्याचीही चर्चा झाली. त्यानंतर मात्र विवेकचं बस्तान सलमानने गुंडाळलं. त्याला सिनेमे मिळेनासे झाले. आणि 'कंपनी', 'साथिया' असे सिनेमे करणारा विवेक बाहेर फेकला गेला. आता तो परत येऊ लागला आहे. मुलाखती देऊ लागला आहे. त्याला सलमानच्या त्या प्रकरणाबद्दल विचारलं असता, तो शांतपणे हसतो. 'आता त्या गोष्टीला जमाना झालाय. त्यावर बोलून काय उपयोग. आयुष्य पुढे जात असतं. आता त्या प्रकरणाने मला काही फरक पडत नाही.' असं सांगून त्यानेे  विषय बदलला.