विद्याने केले फॅनला खूश 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

विद्या बालन ही एक चांगली अभिनेत्री तर आहेच; पण ती एक चांगली व्यक्तीही आहे, हे बऱ्याच जणांना माहीत आहे.

विद्या बालन ही एक चांगली अभिनेत्री तर आहेच; पण ती एक चांगली व्यक्तीही आहे, हे बऱ्याच जणांना माहीत आहे.

प्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्रींसाठी त्यांचे फॅन्स नेहमीच काही ना काही करत असतात. विद्याच्या बाबतीतही असेच झाले.खारला महेश भट्ट यांच्या ऑफिसमध्ये विद्याचे कामानिमित्त येणे-जाणे असते.

त्यांच्या ऑफिसच्या खालीच एक शॉप आहे त्या शॉपमध्ये काम करणाऱ्या आनंद परब याच्याशी विद्याची चांगली ओळख झाली. आनंदने विद्याला काहीतरी गिफ्ट देण्याचे ठरवले. विद्या नेहमीच ट्रेडिशनल कपडे घालते.

त्यामुळे त्याने विद्याला झुमके गिफ्ट करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने होळीच्या दिवशी जेव्हा विद्याची भेट झाली तेव्हा तिला ते गिफ्ट दिले. त्यावर विद्या एकदम खूश होऊन ते झुमके मी नक्की घालेन आणि घातल्यावर तुला सांगेनही, असे म्हणाली आणि तिने तसे केलेदेखील.

त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा तिने ते झुमके घातले तेव्हा तिने आपला झुमके घातलेला फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आणि आनंदला तिने टॅगही केले होते. त्यामुळे विद्याचे आपल्या फॅन्सवर किती प्रेम आहे, हेच दिसून आले.