ओम पुरी यांचा मृत्यू संशयास्पद

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाल्याचे बोलले जात होते; पण शवविच्छेदन अहवालामध्ये मात्र त्याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नसल्याने याबाबतचा संभ्रम आणखीनच वाढला आहे.

मागील काही दिवसांपासून ओम पुरी प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत होते. कौटुंबिक आयुष्यात आलेले वादळ आणि घरातील वाद न्यायालयात गेल्याने ते व्यथित झाले होते.

पाच जानेवारीला ते दुपारपासून मद्यपान करत होते. त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी कौटुंबिक वादाचा उल्लेख असायचा, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दारूच्या नशेत कोसळल्याने ओम पुरी यांच्या डोक्‍याला दुखापत झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.