ऑस्कर पुरस्कारात 'ला ला लँड'ची बाजी

Emma Stone, Casey Affleck
Emma Stone, Casey Affleck

लॉस एन्जल्स - यंदाच्या 89 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'ला ला लँड' चित्रपटाने सर्वाधिक सहा पुरस्कार मिळवत बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान 'मूनलाईट'ला मिळाला. 

कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या या भव्यदिव्य ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राही सहभागी झाली होती. जस्टिन टिंबरलेकच्या गाण्याने ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर हॉलिवूड स्टार्सची मांदियाळी पाहायला मिळाली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार घोषित करताना वॉरेन बेटी यांनी सुरवातीला ला ला लँडचा चुकून उल्लेख केला. पण, त्यांनी लगेच आपली चूक सुधारत मुनलाईट हा सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याची घोषणा केली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कलाकरांकडून होत असलेला विरोध ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही पहायला मिळाला. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटाचा पुरस्कार जिंकणारे इराणचे दिग्दर्शक असगर फरहादी या सोहळ्याला अनुपस्थित राहिले. ‘ला ला लॅण्ड’, ‘मूनलाइट’, ‘फेन्सेस’, ‘लायन’, ‘अरायव्हल’, ‘मँचेस्टर बाय द सी’, ‘हेल ऑर हाय वॉटर’, ‘हिडन फिगर्स’, ‘हॅकसॉ रिज’ या चित्रपटांमध्ये ऑस्करसाठी चुरस होती. अखेर या स्पर्धेत 'ला ला लँड'ने बाजी मारली. ला ला लँड डॅनियन चॅझेली हा ऑस्कर पुरस्कार मिळविणारे सर्वांत तरुण दिग्दर्शक ठरले आहेत. 

सनी पवारला घेतले उचलून
लायन या चित्रपटात भूमिका करणारा मराठमोठा सनी पवार हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. देव पटेलची लहानपणीची भूमिका करणाऱ्या सनी पवारने हॉलिवूड कलाकारांचे लक्ष वेधून घेतले. लायनमधील त्याच्या भूमिकेविषयी बोलताना निवेदक जिम्मी किम्मेलने त्याला उचलून घेतले. यावेळी टाळ्यांच्या कडकडाटाने त्याचे स्वागत करण्यात आले. अनेक सेलिब्रेटींना सनीसोबत सेल्फीही घेतले.

ऑस्कर जिंकणारा मेहर्शला अली पहिला मुस्लिम
मूनलाईट या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळविणारा मेहर्शला अली हा ऑस्कर जिंकणारा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. मूनलाईट चित्रपटात अमली पदार्थांच्या डीलरची भूमिका मेहर्शला अलीने केली आहे. मेहर्शलाला हा पुरस्कार मिळाल्याने भारतीय अभिनेता देव पटेलची ऑस्कर मिळविण्याचे स्वप्न भंगले. पटेललाही याच विभागात मानांकन देण्यात आले होते. 

पुरस्कार विजेते -

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - मूनलाईट
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - केसी अॅफ्लेक (मँचेस्टर माय द सी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एमा स्टोन (ला ला लँड)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डॅमियन चॅझेली (ला ला लँड)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा - बॅरी जेन्किन्स (मूनलाईट)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मेहर्शला अली (मूनलाईट) 
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - वायोला डेव्हिस (फेन्सेस)
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - लीनस सँडग्रेन (ला ला लँड)
  • प्रॉडक्शन डिझाईन - ला ला लँड
  • सर्वोत्कृष्ट गीत - सिटी ऑफ स्टार्स (ला ला लँड)
  • सर्वोत्कृष्ट संगीत - जस्टीन हुरवित्झ (ला ला लँड)
  • सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले - केनिथ लॉनेरगन (मॅँचेस्टर बाय द सी)
  • सर्वोत्कृष्ट व्हिज्युएल इफेक्ट्स - द जंगलबुक
  • सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड शॉर्टफिल्म - पायपर
  • सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचरफिल्म - झुटोपिया
  • सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट - द सेल्समन (इराण)
  • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी - ओ.जे.: मेड इन अमेरिका
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा - कॉलिन एटवूड (फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम)
  • मेकअप आणि केशरचना - सुसाईट स्क्वॉड
  • सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - सलवेन बेलमेर (अरायव्हल)
  • सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - हॅक्सॉ रिज
  • सर्वोत्कृष्ट संकलन - जॉन गिल्बर्ट (हॅक्सॉ रिज)
  • सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्टफिल्म - सिंग
  • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी (शॉर्ट सब्जेक्ट) - द व्हाईट हेल्मेट्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com