ऑस्कर : चित्रपटाचे नाव चुकविणाऱ्यांची गच्छंती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

वॉशिंग्टन : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नाव ऐन घोषणेवेळी बदलले गेल्याने 'अॅकॅडमी अवॉर्ड्स'चे हासू झाले होते. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यापुढील ऑस्कर सोहळ्यांमध्ये त्यांना सहभागी न करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

ब्रायन कुलिनान आणि मार्ता रुईझ अशी त्यांची नावे असून, चित्रपटांच्या नावांच्या पाकिेटांची अदलाबदल केल्याबद्दल त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळे यापुढील ऑस्कर पुरस्कार वितरण कार्यक्रमांत त्यांना सहभागी करून घेतले जाणार नाही. मात्र, प्राईस वॉटरहाऊस कुपर्स या लेखापरीक्षण कंपनीत ते अद्याप भागीदार म्हणून कायम आहेत. 

ऑस्कर पुरस्कारांकडे जगभरातील कलाकारांचे, रसिकांचे तसेच अवघ्या चित्रपटसृष्टीचे लक्ष लागून राहिलेले असते. त्यामध्येही सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणजे सर्वांत प्रतिष्ठेचा मानला जातो. त्याबाबत जगभरातील रसिकांपर्यंत प्रथम बातमी पोचविण्यासाठी माध्यमांमध्येही स्पर्धा असते. यावर्षी हा पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटाचे नावच चुकीचे घोषित झाले. 
प्रथम अत्यंत जोशात 'ला ला लँड' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार यांनी त्याचा आनंदही साजरा केला. ते व्यासपीठाकडे आले, तेवढ्यात सूत्रसंचालकांनी पुन्हा घोषणा केली की, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार 'मूनलाईट'ला मिळाला आहे.