'पद्मावत'च्या डिस्क्लेमरमुळे नवीन चर्चांना उधाण 

padmavat
padmavat

नवी दिल्ली : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाला अखेर मुहूर्त मिळाला असला तरी या चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेला वाद आतापर्यंत थांबलेला नाही. चित्रपट प्रदर्शित होण्याचा वाटेवर असला तरीही शेवटच्या क्षणापर्यंत त्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत.  

नुकतेच 'पद्मावत'च्या टीमने एका प्रसिद्ध वृत्तपत्रात भलेमोठे डिस्क्लेमर छापले आहे. या डिस्क्लेमरमुळे नवीन चर्चांना उधाण आले आहे. या डिस्क्लेमरची सोशल मीडियावरही चर्चा सुरु आहे. काही जणांनी या जाहिरातीविषयी उपरोधिक ट्विटही केले आहे. 
भल्यामोठ्या जाहिरातीच्या रुपात छापण्यात आलेल्या या डिस्क्लेमरमध्ये चित्रपटाविषयी काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

                                              डिस्क्लेमर                                                 

  • हा चित्रपट प्रसिद्ध सुफी कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या 'पद्मावत' महाकाव्यावर आधारित असून, हा एक काल्पनिक चित्रपट आहे. 
  • चित्रपटात राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यातील ड्रीम सीक्वेन्सचे एकही दृश्य नव्हते आणि यापुढेही नसेल. 
  • राजपूत संस्कृतीविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे. त्यांच्यात असलेले धैर्य, पराक्रम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठीच चित्रपट साकारण्यात आला आहे. 
  • या चित्रपटात राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चित्रण प्रचंड आदबीने करण्यात आले असून, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही.
  • चित्रपटात पाच बदल केल्यानंतर, तसेच सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले आहे.
  • यापुढे चित्रपटात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात येणार नाहीत
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com