... अन भन्साळींच्या 'पद्मावती'ची भव्यता दिसली!

सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई : राक्षसी महत्वाकाक्षेचा अल्लाउद्दीन खिल्जी.. धाडस आणि शौर्य यांचा अफलातून मिलाफ असलेला राजा रतन सिंग आणि सौंदर्यवती पद्मिनी या त्रिकोणावर बेतलेला संजय लीला भन्साळींचा पद्मावती या चित्रपटाचा ट्रेलर आज रीलीज झाला. अपेक्षेनुसार भन्साळी यांनी या चित्रपटातही एक भव्य स्वप्न पाहिलेलं दिसतं. 

बाहुबलीनंतर भारतीय बिग स्क्रीनवर आता युद्धपट अवतरण्याचं प्रमाण वाढलं आहेच. पण त्याची भव्यताही सर्वपरीने मोठी असावी याकडेही विशेष लक्ष दिलं जात असल्याचं दिसतं. पद्मावतीचा ट्रेलर पाहताना ही भव्यता जाणवते. पद्मिनीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन सुंदर दिसली आहेच, पण शाहीद कपूरनेही राजाच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येते. या सर्वात कडी केली आहे ती रणवीर सिंगने. अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत रणवीर अफाट वेगळा दिसला आहे. त्याच्या देहबोलीतून त्याचं क्रौर्य दिसतं. सोशल मीडीयावरही या ट्रेलरचं स्वागत झालं आहे. आता उत्सुकता आहे ती चित्रपट प्रदर्शित होण्याची.