पालघरचा सूर यू-ट्युबवर झाला लोकप्रिय 

palghar vocie you tube famous aakash gharat
palghar vocie you tube famous aakash gharat

आकाश घरतच्या गाण्याला 15 दिवसांत साडेआठ हजार हिट्‌स 
पालघर:  पालघर (टेंभोडे) येथील आकाश भूपेश घरत याचा सूर हिंदी सिनेसृष्टीमध्ये सध्या चांगलाच गाजतो आहे. "ए दिल है मुश्‍कील'चे अरजीत सिंग याने गायलेले गाणे लोकप्रिय झाले आहे. हेच गाणे आकाशने स्वतःच्या आवाजात गाऊन यू-ट्युबवर पोस्ट केल्यानंतर या गाण्याला अवघ्या 15 दिवसांत सुमारे साडेआठ हजार यू-ट्युब युझर्सने अल्पावधीत गाण्याचा आस्वाद घेतला आहे. 

"ए दिल है मुश्‍कील' या कव्हर सॉंगचे यू-ट्युबवर लॉंचिंग 14 जानेवारीला करण्यात आले. या गाण्याचे दिग्दर्शन संकल्प उपाध्याय यांनी केले आहे. आकाशचे संगीत क्षेत्रातील शिक्षण स्वप्नील चाफेकर व सुचित भट्टाचारजी यांच्याकडे सुरू आहे. आकाश याआधी टीव्ही रिऍलिटी शो व इतर गाण्याच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाला होता. त्याने गझलसह बॉलीवूड म्युझिकमधील अनेक गाणी आपल्या वेगळ्या व स्वतंत्र शैलीत गायली आहेत. गायन क्षेत्रात भरीव काम करण्यासोबत आपल्या गाण्यांचे यू-ट्युबवर चॅनेल सुरू करण्याचा आकाशचा मनोदय आहे. पहिल्यांदाच म्युझिक लॉंच करतानादेखील अवघ्या पंधरवड्यात मिळालेल्या प्रतिसादामुळे आकाश समाधानी आहे. संगीतप्रेमींना यु-ट्युबवरील www.youtube.com/AkashGharat या स्थळावर हे गाणे ऐकता येईल. हे गाणे ऐकून त्यावर नक्की प्रतिक्रिया द्या, आवडले तर नक्की सगळ्यांबरोबर शेअर करा, असे आवाहन आकाशने व्यक्त केले आहे. गाण्याबरोबरच आकाशला गिटार व पियानो वाजवण्याचा छंद आहे. त्याचप्रमाणे गाण्याचे रीतसर प्रशिक्षण घेता घेता तो रेकॉर्डिंगचे प्रशिक्षणही घेत आहे. 

इथे ऐका आकाशची गाणी 
आकाशच्या गाण्याचे इतर सादरीकरण
www.facebook.com/AkashGharat व www.facebook.com/AkashGharatMusic वर पाहायला मिळेल. 

आकाशला लहानपणापासून संगीताची आवड होती. पोतदार महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याने गायनाचे शिक्षण पदव्युत्तर शिक्षणासोबत सुरू ठेवले. त्याला गायन क्षेत्रात प्लेबॅक गायक म्हणूनच करिअर करायचे आहे. 
श्रुती घरत, आकाशची आई. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com