परेश रावलचा नवा अंदाज 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

अभिनेता परेश रावल यांची बॉलीवूडमधील करिअरची सुरुवात ग्रे शेड भूमिकांनी झाली. त्यानंतर प्रियदर्शन यांनी त्यांना "हेरा फेरी' चित्रपटात विनोदी अंदाजात सादर केले. त्यानंतर त्यांनी अनेक विनोदी भूमिका केल्या. आता परेश रावल सलमान खानचा आगामी चित्रपट "टाइगर जिंदा है'मध्ये नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहेत. परेश रावल यांनी यापूर्वी सलमान खानसोबत "रेडी' सिनेमात काम केलेले आहे. त्यांनी आतापर्यंत अशी भूमिका कधी केलेली नाही. त्यांच्या चाहत्यांसाठी हे सरप्राइज असणार आहे. परेश रावल या चित्रपटाचा हिस्सा बनल्यानंतर दिग्दर्शक अली अब्बास जफरने सांगितले की, मी परेश रावल यांचा चाहता आहे.

अभिनेता परेश रावल यांची बॉलीवूडमधील करिअरची सुरुवात ग्रे शेड भूमिकांनी झाली. त्यानंतर प्रियदर्शन यांनी त्यांना "हेरा फेरी' चित्रपटात विनोदी अंदाजात सादर केले. त्यानंतर त्यांनी अनेक विनोदी भूमिका केल्या. आता परेश रावल सलमान खानचा आगामी चित्रपट "टाइगर जिंदा है'मध्ये नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहेत. परेश रावल यांनी यापूर्वी सलमान खानसोबत "रेडी' सिनेमात काम केलेले आहे. त्यांनी आतापर्यंत अशी भूमिका कधी केलेली नाही. त्यांच्या चाहत्यांसाठी हे सरप्राइज असणार आहे. परेश रावल या चित्रपटाचा हिस्सा बनल्यानंतर दिग्दर्शक अली अब्बास जफरने सांगितले की, मी परेश रावल यांचा चाहता आहे. ते खूप चांगल्या प्रकारे भूमिका साकारतात. मी नशीबवान आहे की मी ज्या प्रोजेक्‍टचा हिस्सा आहे जो यशराज फिल्म्ससोबत परेश रावल यांचा पहिला चित्रपट आहे.