फिल्लौरीचे प्रमोशन फंडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

"फिल्लौरी' या चित्रपटाचे सध्या सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीने या चित्रपटाचे प्रमोशन केले गेले. कधी "शोले'च्या फोटोत, तर कधी कोणाच्यातरी लग्नाच्या फोटोमध्ये या चित्रपटातील भूत म्हणजे शशी ही आपल्याला दिसली. आता या चित्रपटाचे प्रमोशन एका अनोख्या पद्धतीने करण्यात येणार आहे. टेक्‍नॉलॉजीचा जबरदस्त वापर करून या चित्रपटातील भूत शशी ही लोकांना 3डीमध्ये दिसणार आहे. यापूर्वी बॉलिवूडमध्ये कोणत्याच चित्रपटाचे चित्रीकरण अशा प्रकारे केलेले नाही. फिल्लौरीचे हे साधे सरळ गोड भूत आता चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 