सलमानचा बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

मुंबई - हॉटेलमधील वेटरला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीमधील गुलमोहर रोडवरील हुकका पार्लरमध्ये सलमानचा बॉडीगार्ड शेरा याने वेटरला गंभीर मारहाण केली. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर अंधेरीतील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांकडून शेराला अटक करण्याची शक्यता आहे. शेरा हा गेल्या अनेक वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड आहे. शेराची स्वतःची सिक्युरिटी कंपनी असून, तो सेलिब्रेटींना सुरक्षा पुरवितो.