एआयबी विरोधात एफआयआर

टीम ई सकाळ
सोमवार, 10 जुलै 2017

अत्यंत अल्पावधित एआयबी हा ग्रुप आॅनलाईन विश्वात लोकप्रिय झाला. समाजात घडणाऱ्या घडामोडींवर अत्यंत तिखट परंतु तिरकस शैलीत यातील कार्यक्रमांतून भाष्य केले जाते. आता मात्र यातील एका कार्यक्रमामुळे हा ग्रुप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

मुंबई : अत्यंत अल्पावधित एआयबी हा ग्रुप आॅनलाईन विश्वात लोकप्रिय झाला. समाजात घडणाऱ्या घडामोडींवर अत्यंत तिखट परंतु तिरकस शैलीत यातील कार्यक्रमांतून भाष्य केले जाते. आता मात्र यातील एका कार्यक्रमामुळे हा ग्रुप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

आपल्या एका शोमध्ये सहज देता देता एक फोन नंबर देण्यात आला. तो नंबर जयपूरमधील एका महिलेचा असल्याचे निदर्शनास आले आहे. हा शो आॅनलाईन विश्वात आल्यानंतर दिवसभरात या महिलेला 50 फोन आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी तातडीने ही बाब आॅल इंडिया बगचोद अर्थात एआयबीच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनीही आपली चूक कबूल केली असून हा एपिसोड मागे घेण्यात आला आहे. ही चूक अनावधानाने झाली असल्याचे या ग्रुपतर्फे सांगण्यात आले. 

याबाबत सकाळपर्य़ंत तरी एफआयआर मागे घेण्यात आली नव्हती. 

टॅग्स