'कुलस्वामिनी' मालिकेतील प्रशांत चौडप्पा आणि शालेय मित्रमंडळी भेटले 23 वर्षांनी

टीम ई सकाळ
सोमवार, 17 जुलै 2017

मुंबई : शाळा, कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना अनेक वर्षांनी भेटणं हा धमाल अनुभव असतो. त्या वेळी केलेली मजामस्ती आठवून खूप हसू येतं. शाळेच्या मित्रांना अनेक वर्षांनी भेटून अभिनेता प्रशांत चौडप्पानं तब्बल 23 वर्षांनी 'बॅक टू स्कूल'चा अनुभव घेतला. इतकंच नाही, तर जुन्या मित्रमंडळींबरोबर धमाल गाणी म्हटली, नाच केला, अगदी पहिल्यासारखीच चेष्टामस्करीही झाली. स्टार प्रवाहच्या 'कुलस्वामिनी' या मालिकेत प्रशांत 'अवधूत देवधर' ही भूमिका साकारत आहे.

आपण आपल्या दैनंदिन शेड्यूलमध्ये कायमच व्यग्र असतो. आपल्याला घरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी तशी कमीच मिळते. मात्र, फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप सारख्या माध्यमांतून मित्रमैत्रिणी, नातेवाईकांमध्ये संवाद होतो. प्रशांत मूळचा सोलापूरचा. त्याचं शिक्षण झालं मॉडर्न हायस्कूलमध्ये. प्रशांत आणि त्याचे मित्रमंडळीही एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले. या ग्रुपवर रियुनियन करण्याची चर्चा झाली. त्यानुसार नुकतंच या सर्वांचं त्यांच्या शाळेत, सोलापूरला रियुनियन झालं. शाळेतल्या तेव्हाच्या मित्रांपैकी कुणी एअरॉनॉटिकल इंजिनीअर आहे,  कुणी शास्त्रज्ञ आहे, कुणी प्राध्यापक आहे. हे सर्व या रियुनियनसाठी आवर्जून उपस्थित होते.  त्या वेळच्या शिक्षकांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला.

एवढ्या वर्षांनी भेटल्याचा सर्वांनाच आनंद झाला होता. ख्यालीखुशालीची चौकशी झाल्यानंतर पूर्वीसारखीच चेष्टामस्करी झाली, गाणी म्हटली गेली आणि नाचही झाला. एवढं सगळं करूनही प्रशांत दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता चित्रीकरणासाठी सेटवर हजर होता हे विशेष. या रियुनियननं प्रशांतला बॅक टू स्कूलचा आनंद मिळाला.