लग्नालाच पसंती... 

preferences wedding
preferences wedding

आदित्य रॉय कपूर सध्या ओके जानूच्या प्रमोशनमध्ये जाम बिझी आहे. हा चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावर आहे. एक जोडपं"लिव्ह इन'मध्ये राहत असतं आणि नंतर करिअरसाठी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी जातात. हा चित्रपटाचा विषय असल्याने आदित्य जेव्हा प्रमोशनसाठी जातो तेव्हा आवर्जून त्याला प्रश्‍न विचारला जातो. तुझं मत काय? लग्न की लिव्ह इन? आणि आदित्यनेही अधिक आढेवेढे न घेता थेट सांगून टाकलंय. तो म्हणतो,"लिव्ह इन रिलेशनशिप'हे वाईट किंवा चांगले आहे हे मी सांगू शकत नाही. हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. काही जण या रिलेशनशिपमध्ये तग धरतात; तर काही धरत नाहीत. पण मी नक्कीच लिव इनपेक्षा लग्नाला निवडेन. पण म्हणून लिव्ह इन चांगले किंवा वाईट असं नाही. लिव्ह इन रिलेशनशिप आजकाल शहरी भागात सर्रास बघायला मिळते. त्यात खटकण्यासारखं असं काही नाहीय. आपलं आयुष्य कसं जगायचं, हा ज्याचा-त्याचा निर्णय आहे. माझा मात्र लग्न-व्यवस्थेवर विश्‍वास आहे. पण सध्या मला लग्न करण्याची घाई नाहीय. असं गोड हसण्यावारी नेत आदित्यने लिव्ह इन की लग्नव्यवस्था या प्रश्‍नावर डिप्लोमॅटिक उत्तर दिलं. बॉलीवूडमध्ये नायक-नायिकांच्या नात्यांविषयी चवीचवीने बोललं जातं. कुणाशी ना कुणाशी नातं जोडून टीकाटिप्पणी होते, गॉसिपला रंग चढतो. यावर त्यांनी जास्त ओव्हर रिऍक्‍ट होऊ नये. शांत राहावं, असंही आदित्य पुढे म्हणाला. त्यामुळे तरुणींनो, यापुढे लक्षात ठेवा, लग्नसंस्थेवर विश्‍वास असेल तरच म्हणेल आदित्य-"ओके जानू....' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com