…. सेटवरच तिने युनिटसाठी चुलीवर केल्या भाकरी

रविवार, 1 ऑक्टोबर 2017

भाकरींची नेमकी गंमत काय आहे? यावर प्रितम सांगते कि, सिनेमातील एका दृश्यात हलीम म्हणजे मला चुलीवर भाकरी करायचा प्रसंग होता, काही तांत्रिक कारणामुळे सीन दोन तीन वेळा रिटेक झाला, मग सगळ्यांची इच्छा म्हणून त्याच चुलीवर सर्व युनिटसाठी भाकरी मी केल्या. खरंतर चुलीवर भाकर करण्याचा माझा तसा ह पहिलाच अनुभव होता. धुराचा खूप त्रास मला होत होता तरीही मी आनंदाने सगळ्यांसाठी भाकरी केल्या.

मुंबई : सध्या सगळीकडे जोरदार चर्चेत असलेला, ६ ओक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या हलाल सिनेमाबद्दल एक वेगळीच बातमी कानावर आली आहे.. पुण्याची प्रितम कागणे हिने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात पुण्यात नाटकातून केली. अजब लग्नाची गजब गोष्ट हे तिचं गाजलेलं नाटक. नवरा माझा भवरा, निलेश साबळेसोबतचा तिचा सिनेमा. एक चांगले नाटक आणि एक सिनेमा झाल्यानंतर घरच्यांना माझ्या कामावर विश्वास वाटू लागला... प्रितम कागणे सांगत होती, ती पुढे म्हणाली कि, या सिनेमानंतर मी मि.बिन नावाचा एक मल्याळम आणि ३१ ऑक्टो हा हिंदी सिनेमा केला. ३१ ऑक्टो या सिनेमाच्या सेटवरच दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी मला हलाल सिनेमाची गोष्ट ऐकवली, जी माझ्या भावाने म्हणजे अमोल कागणेने घरी सांगितली, आणि मग वडिलांनी निर्मिती करायचे ठरवले.

हलाल सिनेमातील आपल्या भूमिकेबद्दल प्रितम सांगते कि, हलाल  सिनेमात मी हलीम या मुस्लीम मुलीची भूमिका साकारते आहे. जी गावात राहणारी एक साधी मुलगी आहे, तिचा नवरा हेच तिचं विश्व आहे. घरातील एका छोट्या कारणावरून आमचे नवरा बायकोचे भांडण होते आणि त्याने उच्चारलेल्या तलाक या तीन शब्दांनी तिचं जगच संपून जातं. तलाक नंतर हलीम घरी परतते. पण नवऱ्याकडून निघून आल्यावर समाज तिलाच दोषी समजू लागतो. काही दिवसांनी पुन्हा नवऱ्याकडे परत जाण्यासाठी तिला ह्लालाचा नियम पाळावा लागतो, तो म्हणजे दुसऱ्या मुलासोबत लग्न करून, त्याच्यासोबत तीन महिने राहून त्याला तलाक देऊन मग पुन्हा पहिल्या नवऱ्यासोबत लग्न करता येणार होते.

भाकरींची नेमकी गंमत काय आहे? यावर प्रितम सांगते कि, सिनेमातील एका दृश्यात हलीम म्हणजे मला चुलीवर भाकरी करायचा प्रसंग होता, काही तांत्रिक कारणामुळे सीन दोन तीन वेळा रिटेक झाला, मग सगळ्यांची इच्छा म्हणून त्याच चुलीवर सर्व युनिटसाठी भाकरी मी केल्या. खरंतर चुलीवर भाकर करण्याचा माझा तसा ह पहिलाच अनुभव होता. धुराचा खूप त्रास मला होत होता तरीही मी आनंदाने सगळ्यांसाठी भाकरी केल्या.

सिनेमातील कलाकारांबद्दल ती सांगते कि, प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, अमोल कागणे, छाया कदम, विजय चव्हाण यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. प्रियदर्शन आणि चिन्मय या दोन्ही मोठ्या कालाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. दिग्दर्शक शिवाजी पाटील यांचा गोष्टीवरचा अभ्यास खूप असल्याने अनेक बारकावे मला त्यांच्याकडून शिकायला मिळत होते.
 
Web Title: pritam kangane halaal movie esakal news