प्रियंका आणखी एका बायोपिकमध्ये 

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

बॉलीवूडची पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा "मेरी कोम' व "कल्पना चावला' यांच्या बायोपिकनंतर आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या बायोपिक चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

उज्ज्वल चॅटर्जी हे रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहेत. यात प्रियंका रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेमिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रवींद्रनाथ टागोर वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईत राहत होते. त्या वेळी इंग्लंडमधून आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर त्यांचे प्रेम असते. ही मुलगी नंतर शिक्षिका बनते.

कालांतराने त्या दोघांत प्रेमसंबंध निर्माण होतात; मात्र टागोर यांचे वडील यांना ती मुलगी पसंत नसते. तिचे लग्न दुसऱ्यासोबत होते आणि ती इंग्लंडला परतते. रवींद्रनाथ टागोर यांच्या अधुऱ्या प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची कथा उज्ज्वल चॅटर्जी यांची पत्नी सागरिका यांनी लिहिली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑक्‍टोबरमध्ये सुरुवात होणार आहे.