प्रियांकाचे सेलेब क्रश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

तिच्या "क्वांटिको' या हॉलीवूड सीरिजमुळे हॉलीवूडची स्टार बनलेली प्रियांका चोप्रा सध्या तिचा आगामी चित्रपट "बेवॉच'च्या तयारीत मग्न आहे. या चित्रपटात ती व्हिक्‍टोरिया लीडस्‌ची भूमिका करत आहे. त्यानिमित्ताने "मेरी क्‍लेअर' या इंटरनॅशनल मॅगझिनसाठी तिने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक गुपितं समोर आणली आणि त्यातलंच एक म्हणजे तिचं सेलिब्रेटी क्रश... शाळेत असताना प्रत्येकाला कोणता ना कोणता सेलिब्रेटी आवडत असतो. प्रियांकाही त्याला अपवाद नाही. तिच्या या सेलिब्रेटी क्रशचे नाव आहे ट्युपॅक शकूर. ती आठवीत असताना ट्युपॅक शकूर हा अमेरिकन अभिनेता आणि रॅपरवर प्रियांकाचे क्रश होते.

तिच्या "क्वांटिको' या हॉलीवूड सीरिजमुळे हॉलीवूडची स्टार बनलेली प्रियांका चोप्रा सध्या तिचा आगामी चित्रपट "बेवॉच'च्या तयारीत मग्न आहे. या चित्रपटात ती व्हिक्‍टोरिया लीडस्‌ची भूमिका करत आहे. त्यानिमित्ताने "मेरी क्‍लेअर' या इंटरनॅशनल मॅगझिनसाठी तिने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक गुपितं समोर आणली आणि त्यातलंच एक म्हणजे तिचं सेलिब्रेटी क्रश... शाळेत असताना प्रत्येकाला कोणता ना कोणता सेलिब्रेटी आवडत असतो. प्रियांकाही त्याला अपवाद नाही. तिच्या या सेलिब्रेटी क्रशचे नाव आहे ट्युपॅक शकूर. ती आठवीत असताना ट्युपॅक शकूर हा अमेरिकन अभिनेता आणि रॅपरवर प्रियांकाचे क्रश होते. ही गोष्ट फारशी कोणाला माहीतही नसेल; पण या मुलाखतीत प्रियांकाने हे सांगितले. प्रियांका सध्या अनेक मॅगझिन्ससाठी मुलाखती देत्येय आणि तिच्या आगामी "बेवॉच'साठी सज्ज झाली आहे.  

Web Title: priyanka chopra first crush