देसी गर्लचा नवा अंदाज 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ड्रेस, हेअर स्टाईल, मेकअप व अदांमुळे नेहमीच चर्चेत असते आणि पुन्हा एकदा प्रियांका तिच्या ड्रेसमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. ती नुकतीच न्यूयार्कमधील मेट गाला 2017 मध्ये सहभागी झाली होती. या वेळी तिनं हॉलीवूड कलाकारांमध्ये स्वतःची छाप जरा वेगळ्या पद्धतीनं पाडली. तिच्या मोहक अदांनी उपस्थितांना घायाळ केलं. अमेरिकेतील टीव्ही मालिका क्वांटिकोमध्ये अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या प्रियंकानं कॉलर असलेला ट्रेंच कोट घातला होता.

त्यासोबत टाईट बांधलेला हेअर डो व उंच टाचेचे बूट तिने घातले होते. ती हा कोट प्रसिद्ध अमेरिकन वेशभूषाकार राल्फ लॉरेननं डिझाईन केला होता. कोट व गाऊन असं कॉम्बनेशन असलेल्या प्रियांकाच्या वेशभूषेनं अनेकांना थक्क केलं. प्रियांकाने घातलेल्या कोटसारखा दिसणारा गाऊन जगातला सर्वांत लांबलचक गाउन असल्याचं बोललं जात आहे. प्रियांकाने तिच्या या लुकमधील उपस्थितीनं हॉलीवूडमधील अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे. तिच्या या "लय भारी' लुकची आंतरराष्ट्रीय मीडियानंही प्रशंसा केली आहे. लवकरच ही देसी गर्ल हॉलीवूडमधील बेवॉच या सिनेमामध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आलाय. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीला सुरुवात झाली असून, प्रियांकासुद्धा मोठ्या उत्साहानं बेवॉचचं प्रमोशन करतेय. बॉलीवूडच्या या देसी गर्लसाठी मेट गालामधे लक्षवेधी ठरणं ही अभिमानाचीच बाब आहे. 

सोशल मीडियावरही तिच्या या लूकची चर्चा रंगात आली होती. काही नेटकरांनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी तिची खिल्ली उडवली. पण काहीही म्हणा, प्रियांकाची मेट गालामधील अदा पाहून रेड कार्पेटवर किती आल्या नि किती गेल्या लक्षात राहिली; पण लक्षात राहिली ती प्रियांका चोप्राच!