प्रियांका चोप्राला 'क्वॉन्टिको'च्या शुटींगवेळी अपघात

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

प्रियांका नुकतीच गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. बॉलिवूडमधून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

नवी दिल्ली - अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला 'क्वॉन्टिको' या मालिकेचे चित्रीकरण करत असताना किरकोळ अपघात झाला. तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचारानंतर आरामाचा सल्ला देण्यात आला आहे.

‘एबीसी’ या क्वॉन्टिको शोच्या प्रोडक्शन टीमने यासंदर्भात माहिती दिली असून, गुरुवारी चित्रीकरण करत असताना तिच्या डोक्याला दुखापत झाली. तिला तात्काळा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले. स्टंट करताना प्रियांका पाय घसरुन डोक्यावर पडली होती. 

या आठवड्यानंतर ती पुन्हा चित्रीकरणाला सुरवात करणार आहे. प्रियांका नुकतीच गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. बॉलिवूडमधून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.