प्रियांका परततेय... 

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

बॉलीवूडची पिग्गी चॉप्स अर्थात प्रियांका चोप्रा पुढील आठवड्यात भारतात परततेय. मायदेशी परतण्याचा एकीकडे तिला जितका आनंद होतोय, तितकंच दुःख न्यूयॉर्क सोडण्याचंही होतंय. सध्या तरी काही दिवस ती न्यूयॉर्कमध्येच राहणार आहे. आगामी हॉलीवूडपट "बेवॉच'चे प्रमोशन करण्यासाठी ती मायदेशी येतेय. न्यूयॉर्कमध्ये काही दिवसांचाच मुक्काम राहिल्यामुळे ती खूपच भावूक झालीय. तिने त्याबाबत ट्‌विटरवरही भावना व्यक्त केली आहे.

"सामानाचं पॅकिंग करताना मला नेहमीच भावूक व्हायला होतं. अशा वेळी मनात बऱ्याच गोष्टी रेंगाळत राहतात आणि आठवतात,' असं ट्‌विट तिनं नुकतंच केलंय. हॉलीवूड मालिका अन्‌ सिनेमासाठी प्रियांका जवळपास वर्षभर न्यूयॉर्कमध्ये तळ ठोकून आहे. साहजिकच त्या शहराशी तिचं वेगळंच नातं निर्माण झालंय. दरम्यान, तिनं हिंदी चित्रपटांतही काम केलं. सूत्रांच्या माहितीनुसार- ती भारतात आल्यानंतर काही चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्सबाबत विचार करून, त्या साईन करणार आहे.