प्रियांका चोप्राचा आणखी एक हॉलिवूड चित्रपट

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

या चित्रपटाचे दिग्दर्शन सिस्ला होवर्ड करणार आहेत. ‘ए किड लाईक जेक’ या नाटकावर हा चित्रपट बेतला असून, याचे चित्रीकरण न्यूयॉर्कमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

हॉलिवूड : ‘बेवॉच’मध्ये भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूडचा एवढाच चित्रपट करून थांबणार नाही. तिला एव्हाना दुसऱ्या हॉलिवूडपटात भूमिका मिळाली आहे. 

प्रियाकांचा ‘बेवॉच’ 25 जूनला प्रदर्शित होणार आहे. सध्या बेवॉचच्या प्रसिद्धीमध्ये प्रियांका व्यग्र असतानाच तिच्या दुसऱ्या हॉलिवूडपटाची घोषणा करण्यात आली आहे. हॉलिवूडमधील चित्रपटनिर्माते पॉल बेर्नान यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आलेले नाही. 

बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर प्रियांका आता हॉलिवूडमध्येही यशस्वी होताना दिसत आहे. ‘एका नव्या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यात ऑक्टाव्हिया स्पेन्सर, जिम पार्सनस, क्लेअर डेन्स, प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका आहे,’ असे बेर्नान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सिस्ला होवर्ड करणार आहेत. ‘ए किड लाईक जेक’ या नाटकावर हा चित्रपट बेतला असून, याचे चित्रीकरण न्यूयॉर्कमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले.