प्रियांका बनली चित्रकार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

बॉलीवूडची पिगी चॉप्स अर्थात प्रियांका चोप्रानं अभिनयाच्या जोरावर हॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करून भारताचा झेंडा सातासमुद्रापार रोवला आहे. प्रियांका नेहमीच काही तरी हटके करण्याच्या प्रयत्नात असते. अभिनयाबरोबरच तिनं आपली गाण्याची आवडही जपलीय. हॉलीवूडबरोबरच मराठी चित्रपट "व्हेंटिलेटर'मधलं "बाबा' गाणं गाऊन तिनं गायनातही स्वत:ला सिद्ध करून दाखवलंय. मल्टिटॅलेंटेड प्रियांकाला आता चित्रकलेचे वेध लागलेत. पेंटिंग तिनं फार गांभीर्याने घेतलंय. आपलं पेंटिंग काढत असतानाचं छायाचित्र तिनं नुकतंच आपल्या चाहत्यांसाठी "इन्स्टाग्राम'वर शेअर केलं... "रविवारची मस्ती...

बॉलीवूडची पिगी चॉप्स अर्थात प्रियांका चोप्रानं अभिनयाच्या जोरावर हॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करून भारताचा झेंडा सातासमुद्रापार रोवला आहे. प्रियांका नेहमीच काही तरी हटके करण्याच्या प्रयत्नात असते. अभिनयाबरोबरच तिनं आपली गाण्याची आवडही जपलीय. हॉलीवूडबरोबरच मराठी चित्रपट "व्हेंटिलेटर'मधलं "बाबा' गाणं गाऊन तिनं गायनातही स्वत:ला सिद्ध करून दाखवलंय. मल्टिटॅलेंटेड प्रियांकाला आता चित्रकलेचे वेध लागलेत. पेंटिंग तिनं फार गांभीर्याने घेतलंय. आपलं पेंटिंग काढत असतानाचं छायाचित्र तिनं नुकतंच आपल्या चाहत्यांसाठी "इन्स्टाग्राम'वर शेअर केलं... "रविवारची मस्ती... चित्रकला शिकविण्यासाठी यास्मिन व मिशेलची आभारी आहे', अशी पोस्टही तिनं टाकलीय. "दबंग' स्टार सलमान खान आणि "दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा यांनीही आधी चित्रकलेचा नमुना सादर केला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत प्रियांका पेंटिंगमध्ये रमलीय. सध्या ती तिच्या हॉलीवूडमधील पहिला चित्रपट "बेवॉच'च्या रिलीजच्या तयारीत व्यग्र आहे. त्यातून मोकळी झाली की लवकरच तिनं काढलेलं पेंटिंग पाहायला मिळेल... 

Web Title: Priyanka Chopra takes up painting, is Salman Khan her inspiration?