सिरीयाच्या मुलांना भेटली प्रियांका; तिच्या या भेटीवरही ट्रोलिंग

टीम ई सकाळ
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सध्या प्रियांका चोप्रा सिरीयातल्या मुलांना भेटते आहे. युनिसेफच्या माध्यमातून ती या मुलांना भेटली. तीन चार वर्षाच्या मुलांपासून अगदी 12 15 वर्षाच्या मुलामुलींचा यात समावेश आहे. या मुलांमध्ये कोण काय करतं, कोणाची कशात गती आहे हे सगळं तिने ट्विटरवर शेअर केलं आहे. तिच्या या भेटीवर ट्रलकऱ्यांनी आक्रमण केलं आहे. तिथे जाण्यापेक्षा भारतातल्या ग्रामीण भागात जा, तिथे तुला अनेक मुलं भेटतील जी अन्नावाचून उपाशी आहेत अशी सूचना करण्यात आली आहे. पण प्रियांकाने या ट्रोलिंगचा समाचार घेत त्याला उत्तरही दिलं आहे.

मुंबई : सध्या प्रियांका चोप्रा सिरीयातल्या मुलांना भेटते आहे. युनिसेफच्या माध्यमातून ती या मुलांना भेटली. तीन चार वर्षाच्या मुलांपासून अगदी 12 15 वर्षाच्या मुलामुलींचा यात समावेश आहे. या मुलांमध्ये कोण काय करतं, कोणाची कशात गती आहे हे सगळं तिने ट्विटरवर शेअर केलं आहे. तिच्या या भेटीवर ट्रलकऱ्यांनी आक्रमण केलं आहे. तिथे जाण्यापेक्षा भारतातल्या ग्रामीण भागात जा, तिथे तुला अनेक मुलं भेटतील जी अन्नावाचून उपाशी आहेत अशी सूचना करण्यात आली आहे. पण प्रियांकाने या ट्रोलिंगचा समाचार घेत त्याला उत्तरही दिलं आहे. 

युनिसेफने घडवून आणलेल्या या भेटीत प्रियांका अनेक मुलांना भेटली. त्याचे फोटो तिच्या अकाउंटवर दिसतात. मात्र त्याचं कौतुक करण्याएेवजी अनेकांनी प्रियांकाची कानउघडणी केली आहे. यावर तिनेही थेट उत्तर दिलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी युनिसेफचं काम करते आहे. या दरम्यान मी अनेक मुलांना भेटले आहे. आणि मुलांच्या अडचणी या अडचणीच असतात, एकाची दुसऱ्यापेक्षा कमी असं होत नाही. हा आशय तिने आपल्या शब्दात मांडला आहे. 

मुलांमध्ये काम करताना कोणी अशाप्रकारे ट्रोल करणारं असू शकेल याची तिला कल्पना नव्हती. ट्रोलिंगचा मुद्दा पाहता प्रियांकानेे आपल्या देशातल्या मुलांसाठी काम करावे असा त्यांचा आग्रह दिसतो. 

टॅग्स