प्रियांकाचे पत्र... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

शुक्रवारी निर्भया केसमधील आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि भारतात अजूनही न्याय मिळतो याची प्रचिती आली. सेलिब्रिटी मंडळी नेहमीच सामाजिक, राजकीय विषयांवर आपली मते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताना दिसतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही तमाम सेलिब्रिटींनी उदो उदो केला;

शुक्रवारी निर्भया केसमधील आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि भारतात अजूनही न्याय मिळतो याची प्रचिती आली. सेलिब्रिटी मंडळी नेहमीच सामाजिक, राजकीय विषयांवर आपली मते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताना दिसतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही तमाम सेलिब्रिटींनी उदो उदो केला;

पण मनाला भावले ते प्रियांका चोप्राने लिहिलेले पत्र! ती ट्‌विटरवर लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हणते की, "हा न्याय मिळण्यासाठी पाच वर्ष लागली; पण उशिरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला. या न्यायाच्या अग्नीत त्या चार जणांना फाशी झाली; पण जे जे असा प्रयत्न करतील किंवा ज्यांनी केला आहे तेही होरपळून निघू देत, अशी माझी इच्छा आहे. मला माझ्या देशातील न्यायव्यवस्थेचा अभिमान आहे. शेवटी तिला न्याय मिळालाच. तिने आपले प्राण सोडताना तिच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. संपूर्ण देश तिला न्याय मिळण्यासाठी एकजूट झाला होता. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा मी तिरस्कार करते.

पाच वर्षांपूर्वी संपूर्ण देशाने न्याय मागितला होता आणि त्याची कास कधीही सोडली नाही. या लढ्यात सहभागी झालेला प्रत्येक आवाज हेच ओरडत होता, "त्या सहा जणांना शिक्षा झालीच पाहिजे. याची किंमत त्यांना भोगावी लागेलच.' आजच्या एकविसाव्या शतकात अशा प्रकारचे गुन्हे स्त्रियांच्या बाबतीत घडतातच कसे, हा विचार नेहमी मला सतावतो. भारतातील प्रत्येक नागरिकाने अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे; पण दुर्दैवाने घडून गेलेले बदलता येत नाही. जेव्हा एखाद्या गुन्ह्याविरुद्ध संपूर्ण देश एक होऊन आवाज उठवतो; त्या वेळी त्याविरुद्ध न्याय हा होतोच. आपण स्वत: स्वत:ला एक वचन देऊ की, यापुढे असे गुन्हे रोखण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्याप्रमाणे अशा गुन्ह्यांविरुद्ध गप्प न बसता, आवाज उठवू. 

निर्भया आम्ही तुला कधीही विसरणार नाही.' असे म्हणून तिने तिच्या पत्राचा शेवट केला. तिने या पत्रातून जणू हजारो लोकांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी उद्युक्तच केले आहे. 

(संकलन - चिन्मयी खरे)

Web Title: priyanka chopra write a letter