"बेवॉच'नंतर प्रियांकाकडे दोन हॉलीवूडपट 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जून 2017

पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियांका चोप्रा बॉलीवूडच्या बरोबरीने आता हॉलीवूडमध्येही चमकू लागली आहे. तिची "कॉन्टिको' टीव्ही सीरियल चांगलीच गाजली.

पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियांका चोप्रा बॉलीवूडच्या बरोबरीने आता हॉलीवूडमध्येही चमकू लागली आहे. तिची "कॉन्टिको' टीव्ही सीरियल चांगलीच गाजली.

तिचा पहिलावहिला "बेवॉच' हॉलीवूडपट नुकताच रिलीज झालाय. एका निगेटिव्ह भूमिकेत त्यात ती आहे. तिच्या कामाचं सगळीकडून खूप कौतुक होतंय. "बेवॉच'नंतर प्रियांकाने हॉलीवूडचे आणखी दोन चित्रपट साईन केल्याचं सूत्रांकडून समजतंय. "ए किड लाइक जेक' चित्रपट सध्या तिच्या हातात आहे. या महिन्यात त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेया माहितीनुसार प्रियांकाने अजून एक हॉलीवूडपट साईन केलाय. "इजन्ट इट रोमॅंटिक' असं त्याचं नाव असून त्यात प्रियांका हॉलीवूडचा अभिनेता लियाम हेम्सवर्थ व एडम डिवाईन यांच्याबरोबर दिसणार आहे. रोमॅंटिक कॉमेडी असलेल्या चित्रपटाची प्रियांकालाही उत्सुकता लागली आहे.