"पुढचं पाऊल'मध्ये तेजश्री 

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

स्टार प्रवाहवरील "पुढचं पाऊल' मालिकेत आता अभिनेत्री तेजश्री धरणेची एन्ट्री होईल. ती सरदेशमुख कुटुंबातील नवीन सून सायली प्रधान ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ऑस्ट्रेलियातील रोहितच्या म्हणजेच अभिजित केळकरच्या कंपनीत संप होतो आणि त्याचे कोट्यवधीचे नुकसान होते. त्यात रूपाली व तिची आई त्यात आणखी घोळ घालतात. त्यामुळे हे प्रकरण गंभीर होते. हे कमी म्हणून की काय रूपाली आणि रोहितमध्ये घटस्फोट होतो. या दरम्यानच्या काळात रोहितच्या मदतीला सायली प्रधान येते आणि त्याला सगळ्यातून बाहेर काढते. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होते आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात. आणि मग लग्नात.  