अन्‌ पूजाने काढला पळ 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित "बसस्टॉप'च्या चित्रीकरणादरम्यान एक भन्नाट किस्सा घडला. अभिनेत्री पूजा सावंतला पाण्याची फार भीती वाटते.

त्यातही स्वीमिंग पूल म्हटले की नको रे देवा असे ती म्हणते; मात्र चित्रपटाच्या एका दृश्‍यात अनिकेत विश्‍वासरावला पाण्यात ढकलून पूजालाही पाण्यात उडी मारायची होती. दिग्दर्शकांनी ऍक्‍शन म्हटले आणि पूजाने अनिकेतला पाण्यात ढकलले; मात्र स्वतः पाण्यात उडी मारायचे सोडून तिने तेथून चक्क पळ काढला. पूजाच्या या ऍक्‍शनमुळे चित्रीकरणस्थळावर हशा पिकला. रिटेकमध्ये पूजाने सीन पूर्ण केला. 