राखी सावंत विरोधात अटक वाॅरंट

टीम ई सकाळ
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य आणि समाज भावना दुखावल्याबद्दल पंजाब कोर्टाने अभिनेत्री राखी सावंतला अटक वाॅरंट दिले आहे. राखी सावंतने याबाबत जामिनासाठी अर्ज दिला होता, तो कोर्टातर्फे फेटाळण्यात आला. 

गेल्या 5 सप्टेबरला कोर्टापुढे हे प्रकरण आले होते. यापूर्वी या प्रकरणी कोर्टाने राखीला सोमवारी कोर्टात हजर व्हायचे आदेश दिले होते, पण ती अनुपस्थित राहील्याने कोर्टाने आता अटक वाॅरंट जारी केले आहे. सध्या राखी अमेरिकेत असल्यामुळे ती कोर्टात उपस्थित राहू शकली नाही, अशी तिची बाजू तिच्या वकीलांनी मांडली होती.