Pushpa: 'लग्न करेल पण...'श्रीवल्ली फेम रश्मिकाच्या अशा आहेत अटी

पुष्पा या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी (Entertainment News) अभिनेत्री म्हणून अभिनेत्री रश्मिकाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
Rashmika Mandana
Rashmika Mandana

Pushpa Movie: पुष्पा या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी (Entertainment News) अभिनेत्री म्हणून अभिनेत्री रश्मिकाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. अभिनेता अल्लु अर्जुनसोबत (Allu Arjun) रश्मिकाने केलेल्या पुष्पानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. यंदाच्या वर्षी सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून पुष्पाचे नाव घेता येईल. या चित्रपटातील गाण्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सामी, श्रीवल्ली गाण्यानं तर सोशल मीडियावर नवीन ट्रेंडदेखील सेट केला (Social Media News) आहे. यासगळ्यात रश्मिकाच्या पर्सनल लाईफविषयी चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रश्मिका (Rashmika Mandanna) ही अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडाच्या (Vijay Deverakonda) प्रेमात असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ते दोघेही एकमेकांना डेट करत आहे. असे म्हटले जात आहे. मात्र त्या दोघांनी देखील त्या गोष्टीचे खंडन केले आहे. आपण चांगले मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र दुसरीकडे रश्मिका मंदानानं प्रेमावर खुलेपणानं आपले विचार मांडले आहेत. रश्मिकानं इंडिया टूडेशी बोलताना जेव्हा तुम्ही एकमेकांचा आदर करता, त्यांचा सन्मान करता तेव्हा तुम्हाला प्रेमाची किंमत कळते. प्रेम म्हणजे काय, हे सांगणे अथवा पटवून देणं अवघड गोष्ट आहे. मात्र ती अनुभवण्यासारखी गोष्ट आहे. प्रेम हा भावनेचा खेळ आहे. प्रेम हे दोन्ही व्यक्तींकडून हवं. ते एकतर्फी असल्यास त्याचा काय उपयोग. माझा जो जोडीदार असेल त्याच्याकडून मला या साऱ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे मी यासगळ्या गुणांनी युक्त अशा व्यक्तीवर प्रेम करणं पसंत करेल. अशी प्रतिक्रिया रश्मिकानं दिली आहे.

Rashmika Mandana
Video Viral: पहाटेच्या अंधारात विकी-कतरिनाची लपाछपी

लग्नाविषयी रश्मिका म्हणते, लग्नाबद्दल मी इतक्यात काय सांगू, त्याबाबत भाष्य करण्यात मी अजून खूप लहान आहे. अजून काही विचार केलेला नाही. मात्र आपण कोणासोबत आणि कुणाच्या सहवासात सर्वात जास्त सुरक्षित असणार आहोत हे आपल्याला कळलं की, तो प्रश्न मार्गी लागेल. मला ते सर्वात जास्त महत्वाचे वाटते. रश्मिकाच्या वर्क फ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, ती बॉलीवूडमधून डेब्यु करणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्राच्या मिशन मजनूमध्येही दिसणार आहे.

Rashmika Mandana
'TIGER - 3' Movie : ‘टायगर-३’ च्या शूटिंसाठी सलमान-कतरिना राजधानीकडे रवाना | Sakal Media |

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com