कॉर्पोरेट विश्वातला भावनिक संघर्ष...(नवं नाटक : क्वीन मेकर)

हेमंत जुवेकर 
शुक्रवार, 23 जून 2017

काही वर्षांपूर्वी एका नियतकालिकात "स्थळ : दिवाणखाना' शीर्षकाचा एक लेख आला होता. नियतकालिकाचं नाव नाही आठवत; पण मराठी नाटकाची सुरुवात स्थळ दिवाणखान्यापासूनच कशी होते आणि सगळी मराठी नाटकं एकाच वळणाची कशी असतात, असं बरंच काही त्यात होतं. समांतर रंगभूमी जोरात असण्याचा तो काळ... त्यामुळे व्यावसायिक बॉक्‍स नेपथ्याची काहीशी खिल्ली उडवत त्यांची "लेव्हल' दाखवलीही होती त्यात. 

काही वर्षांपूर्वी एका नियतकालिकात "स्थळ : दिवाणखाना' शीर्षकाचा एक लेख आला होता. नियतकालिकाचं नाव नाही आठवत; पण मराठी नाटकाची सुरुवात स्थळ दिवाणखान्यापासूनच कशी होते आणि सगळी मराठी नाटकं एकाच वळणाची कशी असतात, असं बरंच काही त्यात होतं. समांतर रंगभूमी जोरात असण्याचा तो काळ... त्यामुळे व्यावसायिक बॉक्‍स नेपथ्याची काहीशी खिल्ली उडवत त्यांची "लेव्हल' दाखवलीही होती त्यात. 
या लेखानंतर बरीच वर्षं गेली. मराठी नाटक त्यानंतर बरंच बदललं. प्रायोगिक लेव्हलवाली नाटकंही व्यावसायिक रंगभूमीवर अवतरली. दिवाणखान्यातलं नाटक युद्धभुमीवर गेलं, रस्त्यावर गेलं, चाळीत गेलं... आणि आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्येही गेलंय. 
थोडक्‍यात, बरंच बदललंय मराठी नाटक. 

"क्वीन मेकर' हे तेच बदल टिपणारं-मांडणारं नवं नाटक. जॉय नागेश भोसले यांची निर्मिती असलेलं. राज्य नाट्य स्पर्धेत अनेक नाटकं सादर केलेल्या रवी भगवतेंचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक. या कथेत मोठा घटनाक्रम नाही; पण संघर्ष मात्र आहे आणि तो आहे व्यक्तिरेखांचा. 
कॉर्पोरेर्ट जगात माणसाची पैसै कमावण्याची यंत्र होतात, रक्ताची चटक लागल्यासारखी फक्त यशाचीच चटक लागते, त्यासाठी माणसांच्या शिड्या बनवण्यात, कुणाच्या छाताडावर पाय देऊन पुढे जाण्यात यांना काहीच वाटत नाही, आजूबाजूच्यांचं तर जाऊच दे; आपल्याच घरातल्या माणसांच्या भावनांची जाणीव यांना नसते. त्यांच्यापर्यंत फायद्याशिवाय इतर कोणतीही भावना पोहोचू शकत नाही, हे लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केलाय. 

दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी लेखकाला जे काही मांडायचंय ते नेमकं लक्षात घेऊन प्रयोगाची बांधणी केलीय. 
ंडे यांचं हसतं-खेळतं घर. दोघेही कॉर्पोरेट विश्वातली यशस्वी व्यक्तिमत्त्वं. पण मिहिरला दिसत असतं ते फक्त यशच. त्यासाठी दोघांत तिसरं कुणीही त्याला नको असतं. अगदी मुलंही नको. ती प्रगतीत अडथळा ठरतात, असं त्याचं म्हणणं. पण नेहाला त्याचं म्हणणं नाही पटत. त्यातून उभा राहतो त्यांच्यातला संघर्ष. 

या संघर्षात मग अनेक व्यक्तिरेखा येतात. मिहिरचा मित्र (अमित गुहे) जो दोन घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करणार असतो, तो पुन्हा पहिल्या बायकोबरोबरच. मिहिरची सेक्रेटरी मीनल (अंकिता पनवेलकर) जिला मिहिर बायको बनण्याची ऑफर देतो आणि नेहाने दत्तक घेतलेली लाघवी मुलगी परी (एलिना शेंडे). 

या व्यक्तिरेखांचा स्वतःचा वेगळा संघर्ष आहेच. आपल्याला नेमकं काय हवं आहे हे ठरवू न शकलेला मिहिरचा मित्र राहुल, मिहिरची ऑफर ही संधी मानून मध्यमवर्गीय आयुष्यातून कॉर्पोरेट विश्वाच्या सुखासीन; पण अधांतरी जगात जाणूनबुजून उडी मारणारी मीनल, आधी नवऱ्याची सावली बनलेली आणि नंतर काही करून दाखवण्याच्या जिद्दीने पेटलेली नेहा, जगाच्या ताण्याबाण्याची काहीच कल्पना नसलेली लाघवी परी आणि स्वतःपलीकडे काहीही न पाहणारा मिहिर. 

मिहिर म्हटलं तर नायक या नाटकाचा; पण त्याच्यात गुणांपेक्षा दोषच जास्त. त्यामुळे या नाटकाचा अँटी हिरो मानावं लागेल त्याला. मनस्वीपणे स्वतःतच गुंतलेला तो अधिकाधिक स्वतःतच अधिकाधिक कसा अडकत जातो, याविषयी हे नाटक सांगतं. 

राजन ताम्हाणेंनी यातल्या व्यक्तिरेखा नीट कशा उभ्या राहतील हे पाहिलंय. अक्षर कोठारीचा नायक अगदी त्यांच्याच पठडीतला वाटतो. त्यांनी ही भूमिका जशी केली असती तशीच अक्षरने केलीय. अर्थात दिग्दर्शकाचा तेवढा प्रभाव असणारच. अक्षरचं हे मोठ्या काळानंतरच मराठी नाटक. यातला दगडी मनोवृत्तीचा नायक त्याने सहीसही उभा केलाय. शीतल क्षीरसागर ही भूमिका समजूनच ती मांडते. तिचं रंगभूमीवरचं वावरणं भूमिकेची पूर्ण जाणीव ठेवूनच होतं. अंकिता पनवेलकरनंही आपली भूमिका अगदी ठोसपणे सादर केलीय. परीचा निरागसपणा एलिनाकडे अंगभूत आहेच. ती भाव खाऊन जाते. 

बाकी प्रदीप मुळ्येंचं नेपथ्य, परिक्षित भातखंडेंचं संगीत आणि कुहू नागेश भोसलेंची वेशभूषा नाटकाची रंगत वाढवतात. नाटकाची निर्मितीमूल्ये अतिशय उत्तम. त्यामुळे व्यक्तिरेखांचा कॉर्पोटेट संघर्ष मांडणारं हे नाटक एक उत्तम अनुभव देतं. 

डिंक (डीआयएनके: "डबल इन्कम नो कीड') जोडप्यांनी हे नाटक मुद्दाम पाहावं असंच आहे...! 

मनोरंजन

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी...

04.45 PM

मुंबई : अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव गेली २ दशके या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने केलेल्या सर्वच भूमिका या...

04.12 PM

मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कुलस्वामिनी या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची नुकतीच एंट्री झाली आहे. बालकलाकार आर्यन मेघजी या...

03.36 PM