राधिकाविना "फोबिया' 

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

"पार्च्ड', "कबाली', "बदलापूर' असे काही चित्रपट "अहिल्या', "क्रिती', "दॅट डे आफ्टर एव्हरी डे' अशा लघुपटांमध्ये अभिनेत्री राधिका आपटेने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या "फोबिया' चित्रपटातील कामाची खूप प्रशंसा झाली होती.

आता या चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे; मात्र यात राधिकाचा अभिनय तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मग या चित्रपटात कोण, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेलच. या सिनेमाची कथा फिरणार आहे नायकाभोवती. सूत्राच्या माहितीनुसार "फोबिया'च्या निर्मात्यांना "फोबिया'चा सिक्वेल बिग बजेटचा बनवायचा आहे. यात नायकाच्या भूमिकेत मोठा स्टार पाहायला मिळू शकतो.

नेक्‍स्ट जेन प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्‍शन हाऊसचे विकी रजानी यांनी सांगितले की, "फोबिया 2'च्या पटकथेनुसार यात मुख्य भूमिका नायकाची असणार आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला "फोबिया'चा टॉप 10मध्ये समावेश आहे. त्यामुळे सिक्वेलमधील प्रमुख भूमिकेसाठी चांगल्या अभिनेत्याचा शोध सुरू आहे. सिक्वेलची स्क्रीप्ट पूर्ण झालेली असून, लवकरच त्याच्यावर काम सुरू होणार आहे.' आता फोबियाच्या सिक्वेलमध्ये कोणता बिग बजेट नायक दिसणार, याची आपण वाट बघू!