दक्षिणेत त्यांना तुम्ही रात्री हवे असता - राधिका आपटे

बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मराठी प्रायोगिक नाटकांमधून हिरीरीने पुढे गेलेलं नाव म्हणून राधिका आपटेकडे पाहिलं जातं. पुण्याच्या समन्वयमधून राधिका पुढे आली. मराठी नाटक, चित्रपट करत ती आता पार रजनीकांतपर्यंत पोचली. तिने शाॅर्ट फिल्मही केल्या. हिंदी इंडस्ट्रीतलं एक प्रतिभावान नाव म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. राधिकाने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका खुलाशाने मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. तिला एका मुलाखतीत कास्टिंग काउचबद्दल विचारलं तेव्हा तिने दिलेल्या बिनधास्त उत्तराने सगळ्यांनाच धक्का दिला. 

मुंबई : मराठी प्रायोगिक नाटकांमधून हिरीरीने पुढे गेलेलं नाव म्हणून राधिका आपटेकडे पाहिलं जातं. पुण्याच्या नाट्यसंस्थेतून राधिका पुढे आली. मराठी नाटक, चित्रपट करत ती आता पार रजनीकांतपर्यंत पोचली. तिने शाॅर्ट फिल्मही केल्या. हिंदी इंडस्ट्रीतलं एक प्रतिभावान नाव म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. राधिकाने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका खुलाशाने मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. तिला एका मुलाखतीत कास्टिंग काउचबद्दल विचारलं तेव्हा तिने दिलेल्या बिनधास्त उत्तराने सगळ्यांनाच धक्का दिला. 

अभिनेत्री आणि कास्टिंग काऊच हा प्रकार नवा नाही. कित्येकदा त्यावर बोललं जातं किंवा ते लपवलं जातं. पण राधिकाला मात्र ज्यावेळी हा प्रश्न पडला त्यावेळी तिने आपला अनुभव थेट एेकवला. ती म्हणाली, 'दक्षिणेत निर्मात्यांना नायिकांसोबत रात्र घालवायची असते. त्यात त्यांना काही वावगं वाटत नाही. मीही एका निर्मात्याला ज्यावेळी भेटायला जाणार होते, अर्थात तो तिकडचा मोठा निर्माता होता. त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं, की कदाचित तुझ्यासोबत रात्र घालण्याची तो मागणी करेल. पुढे मी तिथे गेले नाही हा भाग वेगळा. पण तिथे या गोष्टी नेहमीच्या झाल्यासारख्या झाल्या आहेत.'

राधिकाच्या या स्पष्टीकरणानंतर मात्र दक्षिणेबाबत उघड भाष्य करणाऱ्यांना विचारात पाडलं आहे.