"उदयस्वर'मध्ये राहुल देशपांडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुंबई : "पंचम निषाद' आणि "पृथ्वी थिएटर्स' यांच्यातर्फे "उदयस्वर' हा कार्यक्रम महिन्याच्या तिसऱ्या रविवारी घेण्यात येतो. "उदयस्वर'चे 16 वे पुष्प राहुल देशपांडे गुंफणार असून हा कार्यक्रम रविवारी (ता.19) सकाळी 7.30 वाजता जुहू येथील पृथ्वी थिएटर्स येथे होणार आहे. 

राहुल देशपांडे यांनी आपल्या गायन प्रतिभेने रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि अभंग गायनावर राहुल देशपांडे यांचे प्रभुत्व आहे. त्यांचे गायन ऐकण्याची संधी "उदयस्वर'च्या निमित्ताने संगीतप्रेमींना मिळणार आहे. या कार्यक्रमात राहुल देशपांडे यांना तबल्यावर प्रसाद पाध्ये व संवादिनीवर आदित्य ओक साथसंगत देणार आहे. पृथ्वी थिएटर्समध्ये कोणत्याही प्रकारची कृत्रिम अथवा तांत्रिक ध्वनिव्यवस्था नाही. येथील आसनक्षमता केवळ 200 आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना पारंपरिक बैठकीचे स्वरूप येते. 
"उदयस्वर' कार्यक्रमाला नोव्हेंबर 2015 पासून सुरुवात झाली. आतापर्यंत या कार्यक्रमात देवकी पंडित, बुधादित्य मुखर्जी, प्रसाद खापरडे, संगीता शंकर, मंजुषा पाटील, बहाउद्दीन डागर, रघुनंदन पणशीकर, रूपक कुलकर्णी, शुचिस्मिता दास, मिलिंद व यज्ञेश रायकर, जयतीर्थ मेवुंडी, तेजश्री आमोणकर, सतीश व्यास, उल्हास कशाळकर आणि शाकीर खान सहभागी झाले आहेत.