324 वर्षांचा माणूस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्याचा धक्का बसला असेल ना...तुम्हाला हा शुद्ध वेडेपणा वाटला असेल ना... 324 वर्षांचा माणूस असतो तरी काय? पण हे खरं आहे. राजकुमार राव हा आगामी "राबता' या चित्रपटात 324 वर्षांचा माणूस साकारतोय. त्याचा या चित्रपटात कॅमिओ रोल जरी असला, तरी त्याने यासाठी अपार मेहनत घेतलेली दिसत्येय. पण तो केवढा यंग आहे. 324 वर्षांचा कसा दिसणार हा तुम्हाला पडलेला पुढचा प्रश्‍न! तर आजकाल प्रोस्थेटिक मेकअपच्या साह्याने कोणाचेही रूप पालटणं सहज शक्‍य झालंय. राजकुमार राव हा पहिला कलाकार नाही जो प्रोस्थेटिकचा वापर करतो आहे.

हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्याचा धक्का बसला असेल ना...तुम्हाला हा शुद्ध वेडेपणा वाटला असेल ना... 324 वर्षांचा माणूस असतो तरी काय? पण हे खरं आहे. राजकुमार राव हा आगामी "राबता' या चित्रपटात 324 वर्षांचा माणूस साकारतोय. त्याचा या चित्रपटात कॅमिओ रोल जरी असला, तरी त्याने यासाठी अपार मेहनत घेतलेली दिसत्येय. पण तो केवढा यंग आहे. 324 वर्षांचा कसा दिसणार हा तुम्हाला पडलेला पुढचा प्रश्‍न! तर आजकाल प्रोस्थेटिक मेकअपच्या साह्याने कोणाचेही रूप पालटणं सहज शक्‍य झालंय. राजकुमार राव हा पहिला कलाकार नाही जो प्रोस्थेटिकचा वापर करतो आहे. याआधी अमिताभ बच्चन यांनी "पा' या चित्रपटात, अक्षयकुमारने त्याच्या आगामी "रोबोट 2.0' या चित्रपटात आणि शाहरूखने "फॅन', ऋषी कपूर यांनी "कपूर ऍण्ड सन्स' चित्रपटात, हृतिक रोशनने "धूम 2'साठी; तर "चाची 420' साठी कमल हासन यांनीही प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला होता. हा मेकअप करण्याची प्रोसेसही खूप वेळखाऊ आणि त्रासदायक असते; पण या मेकअपमुळे अगदी वेगळे दिसू लागता. 
राजकुमार रावही या 324 वर्षांच्या माणसाच्या अवतारात ओळखायला येत नाही. तसा राजकुमार राव त्याच्या हटके भूमिकांसाठीच ओळखला जातो; पण त्याचा हा प्रोस्थेटिकचा पहिलाच प्रयोग आहे आणि अशी वेगळं काहीतरी करण्याची संधी तो कशी सोडेल? 

Web Title: Rajkummar Rao in the getup of a 324-year-old man is ridiculously unrecognizable