रामदेव बाबा आता झळकणार बाॅलिवूडमध्ये

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

योगगुरू रामदेव बाबा आता बाॅलिवूडच्या उंबरठ्यावर उभे आहेत. यह है इंडिया या चित्रपटातील एका गाण्यात हे योगगुरू दिसतील. यापूर्वी पंजाबी संत म्हणवणाऱ्या गुरू राम रहीम सिंग यांनी सिनेमात पदार्पण करून दोन चित्रपटांची निर्मिती केली होती. 

मुंबई : योगगुरू रामदेव बाबा आता बाॅलिवूडच्या उंबरठ्यावर उभे आहेत. यह है इंडिया या चित्रपटातील एका गाण्यात हे योगगुरू दिसतील. यापूर्वी पंजाबी संत म्हणवणाऱ्या गुरू राम रहीम सिंग यांनी सिनेमात पदार्पण करून दोन चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांचा सिनेमा 18 आॅगस्टला प्रदर्शित होईल. 

यह है इंडिया या चित्रपटाबद्दल अद्याप फार माहिती देण्यात आलेली नाही. परंतु त्यातील सैया सैया या गाण्यात रामदेव बाबा दिसणार आहेत. ते म्हणाले, 'भारतीय चित्रपट हा जगभरात नावाजला गेलेला आहे. या कलेला प्रोत्साहन देण्याहेतूने मी या सिनेमात आलो. यात मी काय करेन ते तुम्ही चित्रपटात पहा. परंतु हा माझ्यासाठी वेगळा अनुभव असेल. भारताबद्दल लोकांचे गैरसमज दूर करणारा असा हा चित्रपट असेल.' लोम हार्ष यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 18 आॅगस्टला प्रदर्शित होतोय.