रणबीर कपूरचे नवे घर तुम्ही पाहिले का?

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

मुंबईतील पाली हिल परिसरात रणबीरने त्याचे नवे घर 35 कोटींना खरेदी केले. या संपूर्ण घराची सजावट गौरी खानने केली आहे. रणबीरच्या याच नव्या घराची पहिली झलक गौरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकतीच शेअर केली. काही दिवसांपूर्वीच ऋषीकपूर यांनी ट्‌विटरवरून गौरीचे आभार मानले होते.

रणबीरच्या "ऐ दिल है मुश्‍किल'या चित्रपटानंतर "जग्गा जासूस' या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होता. याचे चित्रिकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून रणबीरने नव्या घरी जाण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. बॉलिवूडमध्ये सध्या अशी चर्चा सुरू होती की, राज कपूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रणबीर नव्या घरी जाणार आणि अगदी तसेच झाले.
रणबीरच्या "वास्तु' नावाच्या या घरात मरून रंगाचा सोफा, भिंतींना पेस्टल कलर, सिलिंगला गोल्डन कॅण्डल्सचे झुंबर लावून दिवाणखान्याची शोभा वाढवली आहे.
गौरीने या छायाचित्रांच्या कॅप्शनमध्ये,""कॉफी विथ रणबीर ऍट वास्तु.''त्यासोबत काही कॅप्शनही लिहिले आहेत. या छायाचित्रांत रणबीरच्या चेहऱ्यावर नव्या घरात राहायला गेल्याचा आनंद ओसंडून वाहात आहे. रणबीर काही दिवस त्याच्या आजीसोबत म्हणजे कृष्णा राज कपूर यांच्या घरी राहात होता.
रणबीरच्या या नव्या घराची आकर्षक सजावटीबद्दल ऋषी कपूर यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये,गौरी खान तू रणबीरच्या घराला "वास्तू'ला खरचं "घर' बनवलं आहेस. ही सजावट पाहून मी आणि नीतू आम्ही दोघंही भारावून गेलो आहोत. तुझे मनापासून आभार!'
--
छायाचित्र सौजन्य- गौरी खान (इन्स्टाग्राम)