रणबीर कपूरने मागितली अभिनेता गोविंदाची माफी

टीम ई सकाळ
रविवार, 9 जुलै 2017

गेली अनेक वर्षे अनुराग बसू दिग्दर्शित जग्गा जासूस या चित्रपटाचे चित्रिकरण चालू आहे. अाता हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना एक नवे प्रकरण यातून बाहेेर आले आहे. या सिनेमात गोविंदा यांची एक भूमिका होती. सिनेमाचे संकलन करताना ती संपूर्ण भूमिका कापावी लागली. याबद्दल रणबीर कपूर याने गोविंदा यांची जाहीर माफी मागितली आहे. 

मुंबई : गेली अनेक वर्षे अनुराग बसू दिग्दर्शित जग्गा जासूस या चित्रपटाचे चित्रिकरण चालू आहे. अाता हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना एक नवे प्रकरण यातून बाहेेर आले आहे. या सिनेमात गोविंदा यांची एक भूमिका होती. सिनेमाचे संकलन करताना ती संपूर्ण भूमिका कापावी लागली. याबद्दल रणबीर कपूर याने गोविंदा यांची जाहीर माफी मागितली आहे. 

याबाबत बोलताना रणबीर म्हणाला, 'खरेतर चूक अामची आहे. संपूर्ण पटकथा तयार नसताना आम्ही सिनेमाचे शूट सुरू केले.  त्यामुळे गोविंदा यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराला घेऊनही आम्हाला त्यांचा रोल कापावा लागला. याला मी आणि अनुराग कारणीभूत आहोत. खरेतर असे व्हायला नको होते. पण आता सिनेमा प्रदर्शित करणे अनिवार्य असल्याने एेनवेळी हा निर्णय घेण्यात आला. याबद्दल मी गोविंदा यांची माफी मागतो.'