शाहरुखच्या चित्रपटात रणबीर पाहुणा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

शाहरुख खान व अनुष्का शर्माचा चित्रपट येणार आहे, ही बातमी आता जुनी झाली आहे. सलमान खानने तर या दोघांच्या एकत्रित पोस्टरवर ट्‌विट करीत त्याची प्रदर्शनाची तारीख 11 ऑगस्ट 2017 असल्याचे सांगितले आहे.

अद्याप नाव निश्‍चित न झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान व अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे यातील पाहुणा कलाकार असेल रणबीर कपूर. करण जोहरच्या मैत्रीमुळे शाहरुख खान 'ए दिल हे मुश्‍किल' चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. यात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता.

आता इम्तियाज अली दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटात रणबीर त्याच्या मैत्रीखातर छोट्या भूमिकेत दिसणार आहे. तो अनुष्का शर्माच्या नियोजित पतीच्या भूमिकेत दिसणार आहे.